India Languages, asked by akshaykumar040105, 4 months ago

create a concept map on samas marathi topic plz its too urgent
agar kisne mera he answer de diya toh 100 extra points

Answers

Answered by chinnyvenkatesh
0

Explanation:

समास विग्रह उदाहरण :

तोंडपाठ-तोडाने पाठ

ऋणमुक्त-ऋणातून मुक्त

प्रतिदिन-दर दिवशी

सत्यासत्य-सत्य किंवा असत्य

लंबोदर-लंब आहे उदर त्याचे तो.

कृष्णार्जुन-कृष्ण आणि अर्जुन

समासाचे प्रकार – Types Of Samas

अव्ययीभाव समास

तत्पुरुष समास

द्वंद्व समास

बहुव्रीही समास

पहिले पद मुख्य, दुसरे पद मुख्य, दोन्ही पदे मुख्य, दोन्ही पदे गौण

१. अव्ययीभाव समास

Avyayibhav Samas in Marathi – अव्ययीभाव समास : यात पहिले पद प्रधान (महव्वाचे) असून असते किंवा अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्यय असतो.

अव्ययीभाव समासाचे उदाहरण :

अजन्म-जन्मापासून

प्रतिवर्ष-दर वर्षाला

आमरण-मरणापर्यंत

घडोघडी-प्रत्येक घडीला

गावोगाव-प्रत्येक गावी

यथाशक्ती-शक्तीप्रमाणे.

इतर उदाहरणे : दरमजल, दररोज, हरहमेश, बिनशर्त, बेलाशक,बरहुकूम, गैरहजर, बरखास्त आसेतू, जागोजाग, घरोघर, पावलोपावली, बेमालूम, रात्रंदिवस, इत्यादी.

२. तत्पुरुष समास

Tatpurush samas in Marathi तत्पुरुष समास: ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.

ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

उपप्रकार पुढीलप्रमाणे.

विभक्ती तत्पुरुष समास –

समासाचा विग्रह करतांना गाळलेला विभक्तिप्रत्यय किंवा गाळलेले शब्द विग्रहामध्ये घालावे लागतात.

विभक्ती तत्पुरुष समास उदाहरणे .

कष्ट साध्या-कष्टाने साध्य (तृतीया तत्पुरुष समास)

शास्त्रसंपन्न-शास्त्रात संपन्न (सप्तमी तत्पुरुष समास)

देवपूजा जोडल्या देवाची पूजा (षष्ठी तत्पुरुष समास).

इतर उदाहरणे – भक्तिवश, गायरान, बाईलवेडा, पोळपाट, गर्भश्रीमंत, स्वर्गवास, पोटशूळ.

कर्मधारय समास :

हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार तयारअसून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते. त्यात क पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते.

कर्मधारय समास उदाहरणे

महादेव-महा असा देव,

सुवासना- सु अशी वासना,

पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष,

घनश्याम-घनसारखा श्याम,

इतर उदाहरणे रक्तचंदन, नीलकमल, पीतांबर, लालभडक, मेघश्याम, नरसिंह, विद्याधन,काव्यामृत.

द्विगू समास

Dvigu Samas in Marathi : यात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण  असून संपूर्ण सामाजिक शब्दाला समुदायवाचक अर्थ प्राप्त होतो. 

द्विगू समास उदाहरणे :

त्रिभुवन-तीन भुवनांचा समुदाय,

पंचपाळे-पाच पाळ्यांचा समुदाय,

इतर उदाहरणे – पंचवटी, चातुर्मास, नवरात्र, सप्ताह, पंचारती, त्रैलोक्य.

मध्यमपद लोपी समास –

यात विग्रह करतांना दोन पदांतील संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात.

मध्यमपद लोपी समास उदाहरणे.

बटाटेभात-बटाटे घालून केलेला भात,

वांगीपोहे- वांगी घालून केलेले पोहे,

पुरणपोळी-पुरण घालून केलेली पोळी,

लंगोटीमित्र-लंगोटी घालत असल्या वेळेपासूनचा मित्र.

नत्रतत्पुरुष समास:

यातील पहिले पद अ, अन् किंवा न असून त्यातून नकार किंवा निषेध व्यक्त होतो. दुसरे पद जर स्वरादी असेल तर पहिले पद अन् हे असते.

उदाहरणे:

अन् + आदर – अनादर = आदर नसलेला

न + गण्य = नगण्य = गण्य नसलेला

इतर उदाहरणे – अपुरा, नास्तीक, अयोग्य, निरोगी, नाइँलाज,बेडर, अहिंसा

उपपद तत्पुरुष :

या समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृदन्ताचे रूप असते. म्हणजे एखाद्या धातूचा एखादा या शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर यात असते.

उदाहरणे

हर्षद-हर्ष देणारा,

नाटककार-नाटक लिहिणारा,

पंकज – पंकात जन्मलेले,

जलद-जल देणारा

इतर उदाहरणे : ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, द्विज,विहंग, शेषशायी, देशस्थ मनुज नृप, सुखद, पयोद, खग, नग, सुज्ञ,कृतघ्न, शेतकरी, लाचखाऊ, आगलाव्या, भाजीविक्या, वाटसरु.

अलुक तत्पुरुष समास ·

ज्या विभक्ती तत्पुरुषात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्या समासाला ‘अलुक् तत्पुरुष समास’ म्हणतात.

अलुक तत्पुरुष समास उदाहरणे:

युधिष्ठिर अग्रेसर,

पंकेरूह,

कर्तरिप्रयोग,

कर्मणिप्रयोग,

सरसिज.

Answered by babasaheb54
0

Answer:

  1. सुखद: : सुख देणारा
  2. मार्गस्थ: : रस्त्यावरून जाणारे
  3. महादेव : :महान असा देव
  4. तोंडपाठ: : तोंडाने पाठ
  5. निरोगी: : रोग नसलेला
  6. डोंगर दर्या : :डोंगर आणि दर्या

Similar questions