India Languages, asked by gopisairamgopi5130, 1 month ago

डोकं खाजवा १. काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहते चंदाराणी =? २. काळी काठी,तेल लाटी, वाकते पण मोडत नाही = ? ३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणी पितो गंगाराम = ? ६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे =? ८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट = ? ९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा = ? ११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी = ? १२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले = ? १३. पा

Answers

Answered by dibya2244
1

Answer:

या कोड्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा

डोकं खाजवा

आई, मावशी, काकू, आजी , पणजी कुणाचीही मदत घेतली तरी चालेल.

पण ओळखा

_पण पासिंग मात्र ६ ठरलंय ._

१. काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहते चंदाराणी =?

२. काळी काठी,तेल लाटी, वाकते पण मोडत नाही = ?

३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणी पितो गंगाराम = ?

४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी =?

५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली = ?

६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे =?

७. सुपभर लाह्या,मधे रुपय्या = ?

८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट = ?

९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा = ?

१०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर = ?

११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी = ?

१२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले = ?

१३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं,कात नाही, चुना नाही,तोंड कसं रंगलं =?

१४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा = ?

१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर = ?

१६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान =?

१७. हरण पळतं, दूध गळतं = ?

१८. आठ तोंडे,जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई =?

१९. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय = ?

२०. वीस लुगडी,आतून उघडी =?

२१. सरसर गेला साप नव्हे,गडगड गेला गाडा नव्हे,गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे =?

*_उत्तर पाठविताना प्रश्न क्रमांक

Similar questions