डोळे कथेतील नायिका कोण आहे ?
Answers
Explanation:
मराठी साहित्याच्या क्षेत्रात अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वेगळ्या वळणाचे व वेगळ्या ढंगाचे आहे. हे साहित्य मानवी मनाला ओढ लावते, उत्सुकता निर्माण करीत परिणाम साधते. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या जशा पुरूषप्रधान आहेत तशा स्त्रीप्रधानही आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांमधील नायिका कथेला व्यापून टाकतात. या साहित्यांमधील स्त्री नायिका स्पष्ट व रोखठोक प्रश्न विचारून घायाळही करतात. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांमधील स्त्रीपात्र ही मनस्वी जीवन जगणारी आहेत. मनस्वी असली तरी समाजाच्या सर्वोच्च स्तरावर बसून, मनस्वीपणे चैन करण्यास मोकळीक असणाऱ्या प्रवृत्तीची नाहीत. समाजातील बंधने तिच्यावर आहेत. स्वतःच्या स्वातंत्र्याकरिता व अस्मितेसाठी ती जबरदस्त झगडणारी व विजय मिळविणारी आहेत. जीवन जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली होताच ती खवळून उठते, पेटून उठते व रणांगणात लढावे तशी ती लढते. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांमधली स्त्री वाचल्यानंतर स्त्रीचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी लिहिणारा हा लेखक बघून मन भारावून जातं, थक्क होतं. या नायिकांमध्ये मंगला, वैजयंता, आवडी, चित्रा, आबी, रत्ना, सीता या मन वेधून घेतात.