India Languages, asked by sandeepvavale789, 5 months ago

ड) तुमच्या परिसरात 'कोरोना' या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तेथील
राहणाऱ्या रहिवाशांना त्याबद्दलची सूचना देणारे 'सूचनाफलक' तयार करा​

Answers

Answered by 5honey
4

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. देशांतर्गतही 'लॉकडाऊन' करण्यात आलंय.

या लॉकडाऊनमुळं कितीतरी काळापासून आपण घरात बंद आहोत की काय, असं वाटू लागलंय. पण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव तर गेल्या वर्षी डिसेंबरपासून म्हणजे तीन-साडेतीन महिन्यांपासूनच सुरू झालाय.

कोरोना व्हायरसबाबत जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करू लागले आहेत, जेणेकरून या विषाणूला रोखण्यासाठी औषध शोधले जाईल. मात्र, औषध दूरच राहिलं, आपल्याला अजूनही या विषाणूबद्दलच संपूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. कोरोना व्हायरसबाबतचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.

यातीलच काही प्रश्नांची आपण इथं चर्चा करणार आहोत.

1) आतापर्यंत किती लोकांना कोरोना व्हायरसची लागण झालीये?

खरंतर अत्यंत सर्वसाधारण प्रश्न आहे हा, पण तितकाच महत्त्वाचा आहे.

जगात संसर्ग झालेल्यांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे, तर मृतांचा आकडा 30 हजारांवर पोहोचलाय.

पण हे आकडे नेमके आहेत का? तर नाही. हे आकडे नेमके नाहीत.

Similar questions