Dialogue writing in Marathi language on flood in kerela
Answers
यावर्षी अतिवृष्टी मुळे केरळ, महाराष्टातील काही भागात पाणी साचले व सगळीकडे हाहाकार पसरला. हा संवाद केराळतील एका पूरग्रस्त शेतकरी राज आणि पत्रकार शीला मधला आहे.
शीला: आज आपण आलेलो आहोत केरळ मधील एका शेतकऱ्याच्या शेतात. त्यांचे नाव राज आहे. ते आपल्याशी चार शब्द बोलतील.
राज: नमस्कार, त्या दिवशी पाऊस पडत होता, आम्हाला वाटलं सहज पडतो तसा पडत असेल.
शीला: मग काय झाले ?
राज: नंतर हळू हळू पाऊस वाढू लागला. पाणी साचू लागले.
शीला: आपण काय केलंत नंतर ?
राज: माझे घर शेतात असल्याने मी माझ्या परिवाराला आधी घराच्या बाहेर काढले व सामान बांधून त्यांना त्यांच्या गावी पाठवले.
शीला: पाणी घरी भरले का ?
राज: हो पाणी घरात भरू लागले म्हणून मी पण उंच जागेवर गेलो आणि माझ्या नातेवाईक,मित्रमंडळी कडे जाऊन बसलो.
माझे अखंड शेताचे नुकसान झाले.
शीला: आपण बघितले की कशा प्रकारे इकडच्या लोकांचे हाल झाले आहेत, आता सरकार त्यांची काय मदत करेल हा मोठा प्रश्न आहे!