Difference between Delhi and Sikkim language in Hindi
Answers
दिल्ली(साचा:Lang-hi, पंजाबी: ਦਿੱਲੀ, उर्दू: دِلّی) or Dehli (साचा:Lang-hi, पंजाबी: ਦੇਹਲੀ, उर्दू: دهلی) हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे. या शहराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी (इ.स. २००५चा अंदाज) असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे.[१][२][३][४] राजधानीचे शहर असल्याने येथे देशातील विविध भागातून नागरिक स्थायिक झाले आहेत, त्यामुळे दिल्ली हे एक बहुसांस्कृतिक महानगर बनले आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती त्यामुळे दिल्लीचा आर्थिक क्षेत्रात विकास झाला आहे. दिल्लीच्या नागरिकांची सरासरी मिळकत ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे.[५]
सिक्कीम हे भारतातील देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य, पूर्वेस भूतान, पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत. आकाराने गोव्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य असलेले सिक्कीम येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे.