(Earth) information in marathi.
Answers
Earth-पृथ्वी
Explanation:
पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.
पृथ्वी
Earth symbol.svg
The Earth seen from Apollo 17.jpg
अपोलो १७ यानातून घेतलेले पृथ्वीचे छायाचित्र
कक्षीय गुणधर्म
इपॉक J2000
अपसूर्य बिंदू
१५,२०,९७,७०१ कि.मी.
१.०१६७१०३३३५ खगोलीय एकक
उपसूर्य बिंदू:
१४,७०,९८,०७४ कि.मी.
०.९८३२८९८८१२ खगोलीय एकक
अर्धदीर्घ अक्ष:
१४,९५,९७,८८७.५ कि.मी.
१.००००००११२४ खगोलीय एकक
वक्रता निर्देशांक:
०.०१६७१०२१९
परिभ्रमण काळ:
३६५.२५६ दिवस
१.००००१७५ वर्ष
सरासरी कक्षीय वेग:
२९.७८३ कि.मी./से.
१०७,२१८ कि.मी./तास
कक्षेचा कल:
संदर्भ (०)
७.२५° सूर्याच्या विषुववृत्ताशी
असेंडिंग नोडचे रेखावृत्त:
३४८.७३९३६°
उपसूर्य बिंदूचे अर्ग्युमेंट:
११४.२०७८३°
कोणाचा उपग्रह:
सूर्य
उपग्रह:
१ (चंद्र)
भौतिक गुणधर्म
सरासरी त्रिज्या:
६,३७१.० कि.मी.
विषुववृत्तीय त्रिज्या:
६,३७८.१ कि.मी.
धृवीय त्रिज्या:
६,३५६.८ कि.मी.
फ्लॅटनिंग:
०.००३३५२८
परीघ:
४०,०७५.०२ कि.मी. (विषुववृत्तीय)
४०,००७.८६ कि.मी. (रेखावृत्तीय)
४०,०४१.४७ कि.मी. (सरासरी)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ:
५१,००,७२,००० कि.मी.² [१]
१४,८९,४०,००० कि.मी.² जमीन (२९.२ %)
३६,११,३२,००० कि.मी.² पाणी (७०.८ %)
घनफळ:
१.०८३२०७३ × १०१२ कि.मी.³
वस्तुमान:
५.९७३६ × १०२४ किलोग्रॅम
सरासरी घनता:
५.५१५३ ग्रॅ./सें.मी.³
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ):
९.७८०३२७ मी./से.²
०.९९७३२ g
मुक्तिवेग:
११.१८६ कि.मी./से.
४०,२७० कि.मी./तास
सिडेरियल दिनमान:
०.९९७२५८ दिवस
२३ तास ५६ मि.०४.०९०५४ से.
विषुववृत्तावरील परिवलनवेग:
४६५.११ मी./से.
आसाचा कल:
२३.४३९२८१°
उत्तर धृवाचे अक्षवृत्त:
९०
परावर्तनीयता:
०.३६७
पृष्ठभागाचे तापमान:
सेल्सियस
केल्व्हिन
किमान सरासरी कमाल
-८९° १४° ५७.७°
१८४ २८७ ३३१
विशेषणे:
पार्थिव
वातावरण
पृष्ठभागावरील दाब:
१०१.३ कि.पा. (समुद्रसपाटीवर)
संरचना:
७८.०८% नायट्रोजन (N2)
२०.९५% ऑक्सिजन (O2)
०.९३% आरगॉन
०.०३८% कार्बन डायॉक्साइड
बाष्प (हवामानानुसार बदलते)
पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.
पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे २० सेकंद लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती; पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी.
पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही गृहावर जीवसृष्टी नाही.पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रवीय क्षेत्राकडे वळतात.
नाव आणि व्युत्पत्ति पृथ्वी अथवा पृथिवी एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ " एक विशाल धरा'असा होतो. एक वेगळ्या पौराणिक कथा अनुसार, महाराज पृथु च्या नावावर याचे नाव पृथ्वी ठेवले गेले. याच्या अन्य नावांमध्ये धरा, भूमि, धरित्री, रसा, रत्नगर्भा इत्यादि सम्मलित अाहे. अन्य भाषेत याला जसे अंग्रेजी मध्ये अर्थ(Earth) आणि लेटिन भाषेत टेरा (Terra) म्हणटले जाते. सगळ्यी नावात याचा अर्थ एकसारखे आहे.