India Languages, asked by preranapatil320, 21 days ago

Easy on शालेय जीवनात शिस्तीचे महत्व​

Answers

Answered by shm0618007jasleen
0

Answer:

शालेय जीवनापासून प्रत्येकालाच शिस्तीचे धडे गिरविले जातात. मात्र याकडे कुणी गांभीर्याने तर कुणी सहजतेने पाहतात. शिस्त मानवाला जीवनात यशस्वी करत असते परंतु कोणाच्या धाकाने अथवा दडपशाहीने शिस्त न लागता, स्वयं शिस्त लागायला हवी जी आपल्याला आयुष्यात यशस्वी करेल.

Answered by Sampurnakarpha
2

Answer:

शिस्तीचे महत्व मराठी निबंध भाषण- Importance of Discipline in Marathi

आयुष्यातील प्रत्येक स्तरात आणि क्षेत्रात शिस्तीला फार महत्व आहे. शालेय जीवनापासून प्रत्येकालाच शिस्तीचे धडे गिरविले जातात. मात्र याकडे कुणी गांभीर्याने तर कुणी सहजतेने पाहतात. शिस्त मानवाला जीवनात यशस्वी करत असते परंतु कोणाच्या धाकाने अथवा दडपशाहीने शिस्त न लागता, स्वयं शिस्त लागायला हवी जी आपल्याला आयुष्यात यशस्वी करेल.

कुठल्याही संस्थेत आपल्या पाल्याला प्रवेश घेतांना संस्थेचे नियम आपल्याला मान्य असल्याचे पालक सांगतात. कारण ती सर्वस्वी त्यांची निवड असते. पण कालांतराने तेच नियम, अटी त्यांना जाचक वाटू लागतात. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, त्यांच्या जीवनात मूल्यांचे संस्कार व्हावेत, ज्यावर भावी आयुष्याचा डोलारा उभा राहणार असतो तो विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा या उद्देशाने नियम केले जातात. विद्यार्थ्यांना शिक्षा व्हावी, पालकांना त्रास व्हावा हा उद्देश नियम करण्यामागे कधीच नसतो. पण पालक हे समजून न घेता त्यावरून प्रचंड अस्वस्थ होतात. कारण मुलांआधी हे नियम त्यांना अनुसरावे लागतात ना! वक्तशिरपणा, शिस्त, वेळापत्रकानुसार गणवेश व पुस्तके, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय विद्यार्थ्यांना शालेय जीवनात लावणे खूप गरजेचे असते आणि पालकांनी नियम पाळण्यात पुढाकार घ्यावा हे अपेक्षित असते. कारण भविष्यात त्यांच्या मुलांनाच याचा फायदा होणार असतो.

आपणाला शिस्त म्हटले की राग येतो. घरात शाळेत वा परिसरात कुठे ही जा आपणाला प्रत्येकजण शिस्तीचेच धडे देतात. खरोखर आपल्या जीवनात शिस्तीला एवढे महत्त्व आहे काय? तर याचे उत्तर मिळते होय. जीवनात आपणाला यशस्वी व्ह्ययचे असेल तर आपल्याजवळ ज्ञान, बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी, प्रचंड श्रम करण्याची तयारी याच्यासोबत काटेकोरपणे काम करण्याची शिस्त असणे गरजेचे आहे.

त्याशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे असे समजायचे. आज आपण जेवढ्याही महान व्यक्तीचे नाव स्मरणात ठेवतो जसे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि तुमचा आमचा सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे सर्वच जण आपल्या जीवनात कधीही शिस्त मोडली नाही. त्यामुळेच तर ते महान आहेत.

आपल्या रोजच्या दिनचर्येत कसलीही शिस्त नसेल तर ठरविलेल्या वेळात एखादे काम पूर्ण करूच शकत नाही. मग शालेय मुलांसाठी शिस्त म्हणजे काय असते ? शाळेच्या वेळापत्रकानुसार शाळेत उपस्थित राहणे, गणवेषामध्ये शाळेत जाणे, शाळेत दिलेला गृहपाठ व अभ्यास न विसरता पूर्ण करणे, आई-वडील आणि मोठ्याना दररोज नमस्कार करणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि वागणे इत्यादी ही यादी अजुन लांबलचक होऊ शकते. शिस्तीचे काही नियम स्वतः तयार करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा, असे वागल्यामुळे काय होते ? असाही प्रश्न मनात येत असतीलच.

शालेय जीवनात शिस्तीत वागले की, त्या शिस्तीचे रूपांतर हळूहळू सवयीत होते आणि आपण एक आदर्श नागरीक म्हणून जीवन जगू शकतो. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपी जाणे यात शिस्त असेल तर व्यक्ती अलार्म न लावता उठू शकतो आणि वेळ न पाहता झोपी जातो. शाळा हे मुलांना घडविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. शाळांमध्ये मुलांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण दिले जात असे नाही, तर जीवनात आपण कशा प्रकारे यशस्वी झाले पाहिजे, याची शिकवणही दिली जाते. तेव्हा शालेय जीवनात मुलांना शिस्तपालनाचे धडेही दिले पाहिजेत. शिस्तपालन हा यशस्वी जीवनाचा पाया मानला जातो. त्यामुळे मुलांच्या अंगी शिस्त उतरविली पाहिजे. प्रत्येक काम वेळेत आणि नियमात करण्याची सवय मुलांना लागणे गरजेचे आहे. या माध्यमातून नव्या पिढीत सुधारणा होतील.

Explanation:

Similar questions