Answers
Answer:
मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही.
मला जाग आली, तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो. सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा-सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. काही न बोलता मी आणि अमित चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती.
आम्ही टेकडीवर पोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता; पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होते. या काम
नि पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते. एखादया विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनात जागी झाली
'कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची!' जिम विकार पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य, प्रसन्न पहाट जो अनुभवतो, त्याचे अंतःकरणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून अजूनही मानवतेचे दर्शन घडते!
त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर घरांच्या छोट्या अंगणात तुळशीवृंदावनांपुढे रांगोळ्यांची शोभा दिसली. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून देवळांतील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे 'प्रसन्नता' भरून राहिली होती. शाहीर होनाजीची 'अमर भूपाळी' जणू साकार झाली होती. काका
न पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.
काही विशेष : शालान्त परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत निबंधांबरोबर मुद्दे दिलेले नसतात. परंतु प्रश्नपत्रिकेतून निवडलेला निबंध कोणकोणत्या मुद्दयांना धरून लिहावा, याचा सराव विदयार्थ्यांना असला तर ते सहजतेने निबंध लिहू शकतील. परीक्षेत निबंध लिहिण्यापूर्वी अशी सवय विदयार्थ्यांमध्ये बाणावी, या उद्देशाने या ब्लागवर सर्व निबंधांसाठी योग्य असे मुद्दे देण्यात आले आहेत.
श्रावणातील प्रत्येक पहाट आपल्याबरोबर चैतन्याची कुपीच घेऊन येते. कधी ते चैतन्य शिवाला बेल, शिवामूठ वाहणाऱ्या भक्तांच्या रूपाने भेटते; तर कधी मंगळागौरीसाठी पत्री-फूले गोळा करणाऱ्या परड्यात दिसते. विविध रंगांचा नाजूक तेरडाही जिवतीच्या व्रतासाठीच सकाळी हसत असतो. तर कुठे शनिवारची कहाणी शनीच्या पूजेची आठवण देते.
अशा या श्रावणातील निसर्गदर्शन घेण्यास निघावे तर सरसर आवाज करीत सर कोसळते आणि आडोसा शोधावा तर पुन्हा हा खट्याळ श्रावण आपले हास्य पिवळ्या उन्हातून ओसंडून देतो. पावसानंतरची ही पहाट तप्त मनाला दिलासा देते व आपूलकीच्या ओलाव्याने खुलविते. अशाप्रकारे essay on pahat in marathi -रम्य पहाट मराठी निबंध हा निबंध वरील प्रमाणे वर्णन करता येईल . आपले रम्य पहाट विषयी काय मत हे कमेंट करून कळवा, तुमची प्रतिक्रीया आमच्यासाठी अमुल्य आहे. धन्यवाद
Explanation: