History, asked by ashwinipawar1984atp, 4 months ago

एका फोटोकडे पाहून अमर म्हणाला, “हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई म्हणते" तर अमरची आई
त्या फोटोतील व्यक्तीची कोण ?
(1) आत्या
(3) आई
(2) मामी
(4) आजी​

Answers

Answered by Anonymous
149

प्रश्न → एका फोटोकडे पाहून अमर म्हणाला, “हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई म्हणते" तर अमरची आई त्या फोटोतील व्यक्तीची कोण ?

उत्तर →आत्या

 \\ \\  \\ \\

Answered by Sauron
124

उत्तर :

(1). आत्या

अमरची आई त्या फोटोतील व्यक्तीची आत्या आहे.

Explanation:

दिलेल्या प्रश्नानुसार,

अमर फोटो दाखविताना सांगत आहे की, फोटो मधील व्यक्ती जिच्या वडिलांची सासू अमरच्या मामाला जावई म्हणते.

मानूया,

फोटो मधील व्यक्ती = y

y व्यक्ती ही अमरच्या मामाची मुलगी आहे हे स्पष्ट होते. कारण तिच्या वडिलांची सासू ही तिच्या आईची आई होईल. म्हणजेच y व्यक्ती ची आई अमरची मामी आहे आणि y व्यक्तीचे वडील अमरचे मामा आहे हे या द्वारे स्पष्ट होते.

सोप्या शब्दात म्हटले तर, y व्यक्ती ही अमरच्या मामाची मुलगी आहे.

अमरची आई अमरच्या मामाची बहीण असल्यामुळे y व्यक्ती ची आत्या आहे हे सिद्ध होते.

(वडिलांच्या बहिणीला आत्या असे संबोधतात)

वरील स्पष्टीकरणावरून, अमरची आई फोटोतील व्यक्तीची आत्या आहे हे स्पष्ट होते.

Similar questions