एक ग्राहक वैयक्तिक मागणी अनेक ग्राहक सहसंबंध पूर्ण करा
Answers
Answer:
" विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्रक होईल ".
विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किंमतींना वैयक्तिक उपभोक्ता (Individual consumer ) किती नगसंख्या खरेदी करतो . हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते . त्यास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात . वैयक्तीक मागणी पत्रक खालील प्रमाणे स्पष्ट करता येईल .
वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे एक उपभोक्त्याची (consumer) साखरेची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शविलेली आहे . यावरून असे दिसून येते की अधिक किंमतीला कमी नगसंख्याची मागणी केली जाते. आणि कमी किंमतींना अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. उदा. साखरेची किंमत जर 10 रुपये असल्यास साखरेची मागणी ही 1 k.g असते त्याचप्रमाणे जर साखरेची किंमत 2 रुपयाने कमी झाली असता तर साखरेची मागणी 5 k.g इतकी वाढते . यावरून किंमत आणि मागणी यांमध्ये व्यस्त संबंध आहे .
वैयक्तिक मागणी वक्र (Individual demand curve):-
वरील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे 'अक्ष' अक्षावर साखरेची मागणी व 'अय' अक्षावर साखरेची किंमत दर्शविली आहे . किंमत व मागणी यामध्ये व्यस्त संबंध दाखवणारा ' मम ' हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा आहे .
ब] बाजार मागणी पत्रक (Market demand sheet) :-
विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी ( ग्राहकांनी ) केलेली मागणी होय .
विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते ( ग्राहक ) किती नगसंख्या खरेदी करतात . हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते . त्यास बाजार मागणी पत्र असे म्हणतात .
विशिष्ट वेळी विशिष्ट किंमतीना बाजारातील सर्व ग्राहकांनी मिळून एखाद्या वस्तूची मागणी केलेल्या व वस्तूची नगसंख्या दाखवणारा तक्ता म्हणजे बाजार मागणी तक्ता होय .
वरील पत्रकात दर्शविल्याप्रमाणे अ, ब, क उपभोक्त्यांची ( ग्राहकांची ) साखरेची विविध किंमतीना केलेली खरेदी दर्शविलेली आहे . यावरून असे दिसून येते की अधिक किंमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते . आणि कमी किंमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते . अशा प्रमाणे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध हे स्पष्ट होते .
Explanation: