एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले
Answers
Answer:
सजीवांचे दोन प्रकार पडतात- एकपेशीय व बहुपेशीय.ज्या सजीवांमध्ये फक्त एकच पेशी असते त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात.
या एकपेशीय सजीवांमध्ये सुध्दा अजून उपप्रकार आढळतात. जसे की Procaryotes व Eucaryotes. प्रोकॅरीयोट्स मध्ये त्याच्या केंद्रकाभोवती (nucleus) आवरण नसते. बहुतांश प्रोकॅरियोट्स हे एकपेशीय असतात.
उदा: जिवाणू (bacteria), archaea,
यूकॅरीयोट्स मध्ये केंद्रकाभोवती (nucleus) असे आवरण असते. प्रोकॅरियोट्सच्या मानाने युकॅरिओट्सचे केंद्रक अधिक विकसित असते.
उदा: काही शैवाल (algae), कवक (fungi) व आदीजीव (protozoa) हे एकपेशीय आहेत.
एकपेशीय सजीव हे पुरातन सजीव समजले जातात. या सजीवांचे वय जवळपास 3.5 ते 4 अब्ज वर्ष आहे असे म्हटले जाते.
Answer:
जेव्हा एखादा जीव एक पेशी पासून बनलेला असतो तेव्हा त्याला एकपेशीय सजीव असे म्हणले जाते . जेव्हा पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली होती तेव्हा सर्वप्रथम एक पेशीय सजीवच निर्माण झाले होते . या एक पेशीय सजीवांपासूनच इतर प्राण्यांची निर्मिती झाली. उदाहरणार्थ अमिबा.