India Languages, asked by Aayushideb2005, 4 months ago

एक शेतकरी- आंब्याची बाग केली.- निवडुंगाचे कुंपण घातले. सुरक्षित -खूप काम पाहतो. निवडुंग तोडतो. नाश -बाग उत्पन्न -मुलगा मूर्ख - बागेतील फळांचा.


story writing in MARATHI.​

Answers

Answered by dilipchoudhay123
29

Explanation:

this can able to help you to write

Attachments:
Answered by amikkr
19

दिलेल्या मुद्यावरून गोष्ट खालील प्रमाणे

  • शिवापूर गावात रामा नावचा एक कष्टाळु शेतकरी राहत होता.रामा आपल्या कुटुंबाबरोबर शिवापुरमध्ये राहत असे. रामा आपल्या काही प्रमाणात असलेल्या जमिनीवर शेती करून सुखी होता.
  • काही वर्ष लोटल्यानंतर रामाने आपल्या जागेत काही आंब्याची झाडे लावली. आता त्या झाडांना चांगली फळेही येऊ लागली. रामाला खूप आनंद झाला. परंतु त्याच्या चिंतेत देखिल भर पडत होती. त्याचे कारण म्हणजे इतक्या प्रमाणात आलेले आंबे बघून त्याला चोरांची भीती वाटू लागली.
  • शेवटी त्याने उपाय म्हणून शेतीला निवडुंगाचे कुंपण करण्याचा निर्णय घेतला. त्याची कल्पना चांगलीच कामात आली व कोणीही आंबे चोरायचे धाडस केले नाही. आंब्याचे चांगले उत्पन्न येऊ लागले.
  • एके दिवशी रामाला काही कारणामुळे शेजारच्या गावात जावे लागले. तो काही दिवसांनी परत येणार असे त्याने घरी सांगितले. जाताना त्याने आपल्या मुलांपैकी एकाला आंब्याच्या शेतावर लक्ष ठेवण्यास सांगितले. हा त्याचा मुलगा मात्र रामा इतका हुशार नव्हता तर मूर्ख होता.
  • रामाच्या सांगण्यावरून त्याचा मुलगा रोज शेतात लक्ष ठेवत असे. पण एक दिवस त्याला वाटले की ह्या निवडुंगाच्या झाडांमुळे आपल्याला काहीही फायदा नाही. ना त्याला फुले येतात ना फळे मग का उगाच बाबांनी हे झाड लावले असेल. त्याने दुसऱ्या दिवशीपर्यंत कुंपण तोडून टाकले.
  • त्याच रात्री काही चोरांनी खूप फळे चोरून नेली. काही प्राण्यांनीही नासधूस केली. दोन दिवसांनी रामा परत आला आणि बागेची अवस्था बघून हताश झाला.

#SP J2

Similar questions