History, asked by atharvyeske87, 7 months ago

एखादी गोष्ट सत्य आहे हे नि:संशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तीचा स्विकार करु नये असे मत .............. याने मांडले. *

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

  • १५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया. आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्‍या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्‍या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.

  • आमच्या क्लास मधे एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजुक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हिच ह्या कथेची “राणी”. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटी मधे होते. राजा च्या बिल्डिंग च्या बाजुने पोलिस वसाहत चालु होत होती. तिचे वडिल पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्ट वर होते त्यामुळे त्यांना जरा बर्‍यापैकी बिल्डिंग मध्ये रहायला मिळाले होते. राजा मुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राजा चे राणी कडे बघणे आणि राणी ने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूरदूर पर्यंत माहित नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळी ची भिस्त त्या नंबर वर असायची. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजुन सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेरिंग करून रक्षा बंधन ला राखी बांधायला यायची.
Answered by 985036
19

Answer:

12. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशय इतर प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये हा इतिहास लेखनाचा शास्त्रशुद्ध नियम कोणी 1.रेने देकार्त2. वॉल्टेअर3. हिरोडोटस 4. जॉर्ज विल्यम फेड्रिक हेगल.

Similar questions