India Languages, asked by meandonlyme291, 11 months ago

एखादया राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या. भारतासमोरील सामाजिकव राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून घ्या. त्यावर वर्गात चर्चा करा. त्या समस्या सोडवण्यासाठी आपणकाय उपाय सुचवाल ते लिहा.​

Answers

Answered by hadkarn
51

Answer:

मी नुकतीच एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याची भेट घेतली व त्यांच्याशी भारताला भेडसावणाऱ्या विविध राजकीय समस्या जश्या नैसर्गिक प्रदूषण, पर्यावरणाचा ह्रास, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नोकरी व्यवसाय व रोजगार, इत्यादी विषयांवर त्यांच्याशी बातचीत केली व त्यांचे विचार जाणून घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वच समस्यांवर एकच रामबाण उपाय म्हणजे चांगले शिक्षण हाच आहे.

मी याबद्दल वर्गात सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली व त्या सोडविण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील हे पाहिले.

आम्हा विद्यार्थ्यांना सुचलेले काही विचार पुढीलप्रमाणे आहेत.

१. सर्वांनी खूप चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे.

३. चांगल्या शिक्षणामुळे प्रदूषण नेमकं कशामुळे होतंय हे कळेल व त्यावर योग्य उपाय केल्यास व जास्तीत जास्त झाडे लावल्यास पर्यावरणाचा ह्रास थांबेल. कचऱ्यापासून चांगलं खत बनवता येईल.

३ चांगल्या शिक्षणामुळे आपण योग्य उमेदवार निवडून देऊ जे सामाजिक समस्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकतील.

४ लोकसंख्या कमी केल्यास तसेच कौशल्य विकास आधारित शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या संधी निर्माण होतील व त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या सुटतील.

५. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली किड आहे चांगल्या मूल्य शिक्षणामुळे ती समस्या देखील सुटेल.

Explanation:

वरील उत्तर आणखी छोटे किंवा मोठे तुम्ही तुमच्या प्रमाणे लिहा. धन्यवाद.

Similar questions