English, asked by nikhilnikinik7191, 1 year ago

Essay in Marathi on majhi aai

Answers

Answered by halamadrid
45

■■ माझी आई ■■

माझी आई माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आणि सगळ्यात खास व्यक्ति आहे. माझ्या आईचे नाव कांता जोशी आहे.माझी दिवसाची सुरुवात तिला पहिल्याबरोबर होते. ती रोज सकाळी मला लवकर उठवते.

ती माझ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते.माझ्यासाठी माझ्या आवडीचे पदार्थ बनवते.घरातल्या सगळ्या सदस्यांची ती काळजी घेते.मी आजारी पडल्यावर माझी खास काळजी घेते.

कधी कधी मला राग आल्यावर मी तिच्यावर चिडते, पण ती माझ्यावर कधीच चिडत नाही.ती माझे फार लाड करते.नेहमी हसतमुख असते. घरी आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार करते.

तिला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा फार आवडते.ती कामाचा कंटाळा करत नाही.मी उदास असल्यावर ती माझी विचारपुस करते व मला प्रोत्साहन देते.

ती घरी नसल्यावर मला खूप कंटाळा येतो.अशी ही माझी आई मला खूप खूप आवडते.

Answered by shruti5886
1

माझी आई निबंध मराठी १०० शब्दात :

यंदाचा ' आदर्श विद्यार्थी' म्हणून माझी निवड झाली, तेव्हा मला प्रकर्षाने आठवण झाली, ती माझ्या आईची ! मुख्याध्यापकांनी माझ्या गुणांचा गौरव केला, त्या सर्व गुणांची श्रेय माझ्या आईकडे जाते.

माझी आई माझ्यावर प्रेम करते; पण शेतीच्या बाबतीत एवढेच खडक आहे. शांत आणि हसतमुख असते. त्यामुळे तिचे" सुहासिनी" हे नाव तिला शोभून दिसते. माझी आई सतत काही ना काही कामात असते. झी टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम पाहते; पण ते पाहता नाही तिथे काही काम चालू असते.

माझ्या आईचा दिनक्रम भल्या पहाटे सुरू होतो. आम्ही जागी होण्यापूर्वीच तिने स्वयंपाक घरातील कामे व तिची स्वतःची असतात. त्यामुळे उरलेला वेळ ते आमच्यासाठी देऊ शकते. माझ्या व माझ्या छोट्या बहिणीच्या अभ्यासाबाबत तिच्या बसते. दुपारच्या वेळी जवळच्या गरीब वस्तीत न चुकता जाते; त्यांच्या अडचणी सोडवते. तेथील स्त्रियांना लिहायला व वाचायला शिकवते.

माझी आईही कलाप्रेमी आहे. ती स्वतः उत्तम चित्र काढते आणि दुसऱ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देते. आमच्यावर तिची खूप माया आहे. तिला सर्वांविषयी आपुलकी वाटते. पण माझ्यावर तिचे खरे प्रेम आहे मी खूप शिकावे असे तिला वाटते. अशा माझ्या प्रेमळ आई बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे.

Similar questions