essay in Marathi true friend
Answers
*खरा मित्र निबंध*
आयुष्यात खूप मित्र झाले. सुखात नेहमी सोबत होते. आनंद साजरा करायला सगळे असायचे पण जो वाईट परिस्थितीत सोबत होता तो माझा खरा मित्र.
नितेश आणि मी एका शाळेत होतो. आठवीत असताना मी एकदा गणितात नापास झालो होतो. अभ्यासात मी बरा होतो, पण गणित काय जमायचं नाही मला. नितेश शाळेत हुशार होता. दर वर्षी पहिला क्रमांक काढायचा. म्हणून आमच्या वर्ग शिक्षकांनी मला नितेशच्या शेजारी बसवले. नितेश मला नेहमी अभ्यासात मदत करत असे. परीक्षेचा आधी तो मला घरी येऊन शिकवत असे व आम्ही सोबत अभ्यास करायचो. त्या नंतरच्या परीक्षेत मी वर्गात पहिला आलो. नितेश दुसरा आला होता तरी त्याला वाईट वाटले नाही. तो माझ्या आनंदात सामील झाला. तेव्हा पासून आम्ही खास मित्र झालो.
आम्ही एकत्र डब्बा खायचो. त्याला कोणी मारलं तर मी जाऊन त्याला मारायचो. शाळेत आम्हाला राम-शाम ची जोडी म्हणायचे.
शाळा संपली, पण मैत्री नाही. अधून मधून आम्ही भेटायचो. एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय ते माहित असायचं. मी डिग्री नतंर बेरोजगार होतो. त्यांनी त्याचा वाशील्यावर मला कामाला लावले. त्याचे खरंतर माझ्यावर खूप उपकार आहेत.
नितेश सारखा खरा मित्र मला लाभला हे भाग्याचंच.