India Languages, asked by Artee7812, 10 months ago

essay on aai baba mazeyashi bolena in marathi

Answers

Answered by prathamesh3225
1

Explanation:

आई-बाबा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कित्येक नवीन नाती निर्माण होतात पण आयुष्यभर सोबत रहाणारं आणि टप्प्या-टप्प्यावर नव्याने उलगडणारं केवळ एकच नातं असतं आणि ते म्हणजे आई-वडिलांसोबत असणारं आपलं! माझे आई-बाबा म्हणजे माझ्या जीवनाचे ते दोन खांब, जे माझ्या अडखळत्या रस्त्यावर माझ्या मदतीसाठी खंबीर उभे असतात. मार्ग तोच, खड्डे तेच पण किस्से वेगळे, मदत वेगळी. अशाच काही आठवणींनी आज पुन्हा एकदा मला भेट दिली.

बालपण हे खेळण्याचं वय. एवढ्याश्या हाताने बाबांचं बोट धरून चालता-खेळताना मी बऱ्याचदा धडपडायचे, लगेच रडायला लागायचे. तेव्हा बाबांनी कडेवर घेतल्याशिवाय व आईने मायेचा हात फिरवल्याशिवाय माझे शांत होणे असंभव असायचे. मला पाडल्यामुळे त्या बिचाऱ्या जमिनीला बाबांनी रागावल्याचा आनंद काही वेगळाच असायचा. आईने सांगितलेल्या सर्व गोष्टी जणू काळ्या दगडावरची रेघ. लहान असतानाचं ते निरागस प्रेम काहीतरी निराळंच होतं. आता मात्र ह्या नात्यानं एक नवंच रूप घेतलं आहे. तरुणावस्थेत अन पुढची पिढी असल्यामुळे माझे काही वेगळेच विचार चालू झाले. "आई-बाबा, हे असं नसतं, तुम्हाला नाही माहिती!" हा संवाद आता वाढायला लागला पण तरीही माझ्या आईने समजावणे काही सोडले नाही. आता आई म्हणून नव्हे तर मैत्रीण म्हणून ती माझ्याशी गप्पा मारू लागली, मला माझे विचार मांडू द्यायला लागली व तिच्या भावनाही मोकळेपणाने व्यक्त करू लागली. माझे बाबाही काही कमी बदलले नाहीत, बरं का! "बाळा" म्हणून रोज जवळ घेणारे माझे बाबा आता मला माझ्या जखमांना स्वतःहून सहन करायला शिकवू लागले. मला त्यांच्या बरोबरीचे मानून ते माझ्याशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू लागले. हा बदल होता होता मी किती मोठी झाले, कळलच नाही!

आयुष्याची पण गंमत वाटते....रोज समोर असलेल्या आई-बाबांबरोबरही किती वेगवेगळी नाती अनुभवायला मिळतात. आई-वडील जगातल्या कुठल्याही नात्याची कमतरता पूर्ण करू शकतात. म्हणूनच तर म्हणतात ना, देव सगळीकडे राहू शकत नव्हते, म्हणूनच त्यांनी आई-बाबांना बनवलं !

Similar questions