essay on bakachi atmakatha in marathi
Answers
■■बाकाची आत्मकथा■■
नमस्कार,मित्रांनो मी तुमचा मित्र 'बाक' बोलत आहे.आता मी खूप खराब झालो आहे,म्हणून मी खूप वाईट दिसतो.पूर्वी मी असा नव्हतो.
माझा जन्म झाला तेव्हा मी खूप सुंदर होतो.माझा जन्म एका कारखान्यात झाला होता.तिथे माझ्यासारखे माझे अनेक मित्र होते.आम्ही लाकड़ापासून बनवले गेलो होतो व आमच्यावर छान भड़क तपकिरी रंग लावले गेले होते.
नंतर मला माझ्या इतर मित्रांसोबत एका शाळेत पाठवण्यात आले होते.त्या शाळेत पाचवीच्या वर्गात पुढच्या जागेवर मला स्थान मिळाले होते.मुले माझ्यावर बसण्यासाठी भांडण करत होती.मी तिथे खूप खुश होतो.
मी सगळ्या मुलांची खूप मदत केली.माझ्यामुळे त्यांना आरामात अभ्यास करता आले.पण काही वर्षांनी,ती मुले माझ्याशी अगदी वाईट वागू लागली.
त्यांनी माझ्यावर शाईचे डाग पाडले.काहीबाही लिहून ठेवले. ती मुले माझ्यावर उड्या मारायची. एक दिवशी मुलांमध्ये भांडण झाले,ती माझ्यावर चढून एकमेकांना मारू लागली.त्या भांडणामध्ये मी तुटलो.
माझ्या अशा अवस्थेमुळे मला शाळेच्या स्टोर रूम मध्ये ठेवण्यात आले.देव जाणे आता माझ्या भविष्यात काय लिहिले आहे!