Essay on Carpenter in Marathi language
Answers
Answer:
why did you want a eassy on carpenter
■■सुतार (carpenter) वर निबंध■■
सुतार असा व्यक्ति असतो जो लाकड़ापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो.लाकडाच्या वस्तू दुरुस्त करण्याचे काम सुद्धा सुतार करतो. सुतार दरवाजे,कपाट,खुर्च्या, बेड,टेबल,शेतात वापरले जाणारे अवजार आणि इतर वस्तू बनवतो.
लाकड़ापासून विविध गोष्टी बनवण्याठी त्याच्याकडे विविध अवजार आणि साधन असतात.तो त्याच्या कामासाठी पेंसिल,पेचकस,मौज पट्टी,छिन्नी,कुऱ्हाड, हातोड़ा,खिळे, करवत,कॅलिपर आणि इतर विविध अवजारांचा उपयोग करतो.
एका सुताराचे काम खूप कठीण असते. त्याच्या कामासाठी खूप मेहनत आणि कौशल्य लागते.कोणतीही वस्तू बनवायच्या अगोदर सुताराला त्या वस्तूला बनवण्यासाठी योजना तैयार करावी लागते आणि त्याच योजनेनुसार काम करावे लागते.
आपल्या समाजात सुताराचे काम खूप उपयोगी आणि महत्वपूर्ण असते.सुतार आपल्या घरातील फर्नीचर आणि इतर सजावटीच्या वस्तू बनवतो.आपल्या आरामासाठी तो आपल्या गरजानुसार विविध गोष्टी बनवतो.त्याचे काम खूप कष्टाचे असते.