Essay on dr apj abdul kalam in marathi - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम वर निबंध लिहा
Answers
अवूल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे भारताचे पूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव होते. त्यांना "मिसाइल मॅन" म्हणून ही ओळखले जाते. अब्दुल कलाम सरांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ ला तामिळनाडू च्या रामेश्वरम येथे एका गरीब मुस्लिम परिवारात झाले होते. ते बालवयापासूनच विद्याव्यासंगी होते. वाचनाचा छंद त्यांना परिस्थितीवर आघात करून समोर वाढण्यास प्रेरित करत होता.
आपले पदवीचे शिक्षन पूर्ण केल्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून भारताच्या रक्षा संशोधन आणि विकास या संस्थेत पदार्पण केले. नंतर त्यांची बदली भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इसरो) येथे भारतातील पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV-III) निर्मिती च्या संचालक पदी झाली. इथे त्यांनी भारताची रोहिणी हे अंतरिक्ष वाहन पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यास यश प्राप्त केले. त्यांनी ह्या नंतर विज्ञानांवर अनेक प्रयोग केले आणि ते यशस्वी रित्या पार पाडले. भारताला अणुबाँब शक्ती संपन्न देश बनविण्याचा श्रेय त्यांनाच जातो.
पुढे ते भारताचे ११वे राष्ट्रपती बनले. त्यांनी अग्निपंख, भारत २०२०, जागृत मन, अशी अनेक पुस्तकेहि लिहिली. त्यांना पदम भूषण, पदम विभूषण आणि भारतातील सर्वोच नागरिक पुरस्कार भारत रत्नाने सन्मानित करण्यात आले. अश्या थोर विभूतींचे निधन शिलॉंग येथे २७ जुलै २०१५ रोजी झाला.
Answer:
ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.