India Languages, asked by tillquote9486, 11 months ago

Essay on fast food in Marathi

Answers

Answered by YourDad0
2

Answer:

जंक फूड म्हणजे जिभेला सतत हवेसे वाटणारे झटपट तयार होणारे किंवा भरपूर तेलात तळलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे आणखी जास्त हानिकारक परिणाम समोर येत आहेत. या पदार्थांमुळे केवळ शरीरातील चरबीमध्येच वाढ होत असून या पदार्थाच्या सततच्या सेवनामुळे यकृताचीही हानी होत असल्याचे दिसून आले आहे. साधारणपणे कावीळ झाल्यावर ज्या प्रकारे यकृताची हानी होते, तशाच प्रकारचा परिणाम हे पदार्थ खाण्यामुळे होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ एक महिना फास्ट फूड काण्यामुळे देखील यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. विशेषत: 'फ्राइड चिकन' आणि 'ओनियन रिंग्ज' सारखे खाद्यपदार्थ लिव्हरसाठी ‍हानिकारक असून त्यामुळे शरीरात अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते व जे लोक हे पदार्थ खातात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Similar questions