India Languages, asked by suvarnahundekari68, 7 months ago

essay on fort in marathi​

Answers

Answered by kaabushoaib
1

Answer:

hope its help you

Explanation:

plz mark me as brainlist and follow me plz

Attachments:
Answered by rupalichavan1717
3

Answer:

hope it helps u

Explanation:

महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहेत येथील किल्ले. महाराष्ट्रातील किल्ले (forts in maharashtra) हे बहुतांश पश्चिम घाट किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहेत. यापैकी बरेचसे किल्ले आजही त्यांचं सौंदर्य राखून आहेत. ज्यामध्ये रायगड, राजगड, कर्नाळा किल्ला, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड. यापैकी शिवाजी महाराजांच्या अखत्यारित 300 किल्ले असल्याचं म्हटलं जातं. ज्यापैकी पाच किल्ले हे जलदुर्ग होते. हे सर्व किल्ले त्यांच्या निसर्गसौंदर्य आणि आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असल्याने ते ट्रेकिंगसाठी आजही पसंत केले जाते. महाराष्ट्राचं कुलदैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले आणि त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.

रायगड किल्ला (Raigad Fort)

रायगड किल्ला

Raigad Fort Information In Marathi : महाराष्ट्राच्या किल्ल्यातील हा सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो. रायगड किल्ल्याची माहिती ही अनेकजणांना असतेच असते. कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत राजधानीचा किल्ला होता. हा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल 2690 फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगररांगेत आहे. या किल्ल्यामागे सुवर्ण इतिहास आहे. कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. तसंच याच किल्ल्यावर राजेंनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला होता. अनेकदा इंग्रजांकडून आक्रमण होऊनही हा किल्ला आजही अभेद्य आहे. या किल्ल्यावरील हिरकणीची कथाही प्रसिद्ध आहे. इथे हिरकणीचा बुरूज आणि महा दरवाजा ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.

स्थळ: रायगड

भेट देण्याची वेळ: या किल्ल्याला भेट देण्याची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6.

कसं पोचाल: इथे पोचण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे वीर रेल्वे स्टेशन.

शिवनेरी किल्ला (Shivneri Fort)

शिवनेरी किल्ला

वाचा - जर तुम्हालाही ही ऐतिहासिक स्थळे पाहायची असतील तर खालील माहीती जरूर वाचा

Shivneri Fort Information In Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावन जागा म्हणजे शिवनेरी किल्ला होय. त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे. हा किल्ला त्रिकोणी आकारात बांधण्यात आलेला असून यामध्ये मशिद, तळी आणि समाधी आहेत. इथे शिवाई देवीचं देऊळ आहे. या किल्ल्याचं प्रवेशद्वारही मोठं आहे. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे जिजाबाई आणि किशोरवयीन शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा होय. महाराष्ट्रातील किल्ले (maharashtratil kille) शिवनेरी हा किल्ला चढणं तसं सोपं आहे.

स्थळ: जुन्नर

भेट देण्याची वेळ: दिवसभरात कधीही भेट देऊ शकता

कसं पोचाल: इथे जाण्यासाठी सर्वात सोयीचं ठिकाण म्हणजे पुणे.

सिंहगड किल्ला (Sinhagad Fort)

सिंहगड किल्ला

Sinhagad Fort Information In Marathi : पुण्यात असलेला सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी मुघलांच्या ताब्यातून सोडवत सर केला होता. या किल्ल्यातही आजही घोड्यांचे तबेले दिसतात. जे मराठा सैन्य त्यांच्या घोड्यासाठी वापरायचे असं म्हटलं जातं. या किल्ल्यामध्ये शूर मराठी योद्धा तानाजी मालुसरे यांचं स्मारक बांधण्यात आलं आहे. तसंच इथे राजाराम छत्रपती यांची समाधी आणि देवी कालीचं देऊळही आहे.

स्थळ: थोपटेवाडी, पुणे

भेट देण्याची वेळ: या किल्ल्याला तुम्ही सकाळी 5 ते रात्री 9 या दरम्यान भेट देऊ शकता.

कसं पोचाल: हा किल्ला पुण्यापासून जवळ असल्याने तुम्ही पुण्यात उतरून किंवा रस्तेमार्गे इथे जाऊ शकता.

राजगड किल्ला (Rajgad Fort)

राजगड किल्ला

Rajgad Fort Information In Marathi : हा किल्लाही पुण्याजवळ असून तो सह्याद्रीतील मुरूंबदेवी डोंगर माथ्यावर बांधण्यात आला आहे. हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होय. तसंच असंही म्हटलं जातं की, शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ इथे व्यतित केला होता. हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. राजगडावरून तुम्ही सह्याद्रीचा अप्रतिम नजारा पाहू शकता.

स्थळ: बालेकिल्ला रोड

भेट देण्याची वेळ: दिवसभरात कधीही भेट देऊ शकता

कसं पोचाल: इथे पोचण्यासाठीही तुम्ही पुण्याहून जाऊ शकता.

Mark me as brainliest

Similar questions