India Languages, asked by rishi12351, 10 months ago

Essay on great indian bustard in marathi​

Answers

Answered by RudraRithwik
9

Answer:

वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (WII) सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एकही माळढोक पक्षी आढळलेला नाही. माळढोक खरंच महाराष्ट्रातून 'इकॉलॉजीकली डेड' झाला आहे का?

काही शास्त्रज्ञांनुसार माळढोक खरंच नामशेष झाला आहे. तर काही अभ्यासक माळढोक महाराष्ट्रातून संपल्यात जमा आहे, अशी भीती व्यक्त करत आहेत. पण हा पक्षी महाराष्ट्रातून नामशेष झाला आहे, असं अधिकृतरित्या सांगितलं जात नाही.

मात्र WII नं एका सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात एकही माळढोक दिसला नाही, असं आता मान्य केलं आहे. बीबीसी मराठीनं माहितीच्या आधिकाराअंतर्गत WII कडून ही माहिती मिळवली आहे.

रात्रीस खेळ चाले प्रकाश प्रदूषणाचा!

समुद्राच्या वाढत्या 'अॅसिडीटी'चा सर्व जीवांना त्रास होणार

अर्ध्या महाराष्ट्राचा होत आहे वाळवंट : इस्रो, एसएसी

यापूर्वीही, माळढोक महाराष्ट्रातून इकॉलॉजिकली डेड झाला आहे, असं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रकल्प संशोधक सुजीत नरवडे यांनीही बीबीसी मराठीला सांगितलं होतं.

International Union for Conservation of Nature (IUCN)ने यापूर्वीच माळढोकला अतिसंकटग्रस्त (Critically endangered) म्हणून जाहीर केलं आहे.

या पक्ष्याची आता महाराष्ट्रातली संख्या इतकी कमी झाली आहे की, त्यात वाढ होणं आणि त्यांचं पुनरुज्जीवन होण्याची शक्यता जवळपास संपली आहे.

WII चा सर्व्हे काय सांगतो?

WII नं 2013पासून देशात Habitat Improvement and Conservation of Great Indian Bustard (GIB अर्थात माळढोक) हा कार्यक्रम सुरू केला आहे.

देशातील काही अतिसंकटग्रस्त प्रजातींचं पुनरुज्जीवन करण्यासाठी WIIनं हा कार्यक्रम सुरू केला आहे.

या अंतर्गत महाराष्ट्रातल्या माळढोकचा अधिवास असलेल्या परिसरात 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला. वनविभागही या सर्व्हेमध्ये सहभागी झाला होता.

राज्यातल्या माळढोकच्या अधिवास क्षेत्रांचं 372 ग्रीड करून हा सर्व्हे घेण्यात आला. माळढोकचा महाराष्ट्रातला हा पहिला लँडस्केप लेव्हल सर्व्हे असल्याचं WIIने म्हटलं आहे.

पण या सर्व्हेमध्ये एकही माळढोक दिसून आला नाही. 2011 साली महाराष्ट्रातली माळढोकची संख्या 25 ते 30 इतकी होती, असं WIIनं म्हटलं आहे.

माळढोक इकॉलॉजीकली डेड

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रकल्प संशोधक सुजीत नरवडे म्हणाले, "एखादी प्रजाती नामशेष झाली असं अधिकृतरित्या सांगण्यासाठी किमान 4 ते 5 वर्षं अभ्यास करावा लागेल. पण माळढोकची राज्यातील संख्या लक्षात घेता, तो महाराष्ट्रातून इकॉलॉजीकली डेड झाला आहे."

विमान प्रवासात विनयभंग, झायरानं मांडली इंस्टग्रामवर व्यथा

गुजरात निवडणुकीत विकास आधी पागल झाला आणि मग धार्मिक!

"माळढोकची महाराष्ट्रातली संख्या वाढण्याची शक्यता आता फारच कमी आहे. नाणज इथं एक महिन्यापूर्वी फक्त एक मादी दिसली होती. तर विदर्भातल्या चंद्रपूरमध्ये 2 ते 3 माळढोक गेल्या वर्षी दिसले होते." असं त्यांनी पुढे सांगितलं.

"माळढोकचं पुनरुज्जीवन होण्यासाठी किंवा त्यांची संख्या वाढण्यासाठी पक्ष्यांची ही सध्याची संख्या फारच कमी आहे," असं त्यांचं म्हणणं आहे.

अहमदनगरमध्ये तर 2000 सालापासून माळढोक दिसलेलाच नाही, ही बाब त्यांनी निदर्शनास आणली.

जे चित्त्याचं झालं ते माळढोकचं होईल?

सोलापुरातील अभ्यासक अमोल लोखंडे यांनी ज्या प्रकारे चित्ता भारतातून नामशेष झाला, तसाच माळढोकही महाराष्ट्रातून नामशेष होईल, अशी भीती व्यक्त केली.

लोखंडे सोलापुरातील गवताळ प्रदेशातले पक्षी यावर PhD करत आहेत.ते म्हणाले, "नाणजमध्ये माळढोक संपल्यात जमा आहेत. या अभयारण्यात एक मादी दिसली होती. ही मादी प्रजननक्षम असेपर्यंत तिला नर भेटणं आणि या माळढोकचं प्रजनन होणं, ही कल्पना प्रत्यक्षात कितपत शक्य होती?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

चंद्रपूरमधले पक्षीनिरीक्षक विपीन फुलझेले सांगतात, "चंद्रपूरमध्ये ही माळढोक दिसलेला नाही. 8 जुलैला भद्रावती तालुक्यातल्या पावना इथं एक मादी दिसली होती."

गोंदिया आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या Sustaining Environment And Wildlife Assemblage (SEWA) या संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी माळढोकचं महाराष्ट्रात पुनरुज्जीवन आता फारच कठीण असल्याचं सांगितलं.

माळढोकला वाचवण्यात आपण कमी पडलो, विशेष करून वास्तव लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात पूर्ण अपयश आल्यानं आजची स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात माळढोक किती?

मात्र WIIचे संशोधक बिलाल हबीब यांच्यानुसार "या सर्व्हेमध्ये एकही माळढोक आढळला नाही, म्हणजे महाराष्ट्रात माळढोक नामशेष झाले, असा निष्कर्ष तातडीनं काढता येणार नाही." महाराष्ट्रात माळढोकची संख्या फारच कमी झाली असल्याचं त्यांनी मान्य केलं.

IS विरुद्ध सुरू असलेलं युद्ध संपल्याची इराकची घोषणा

'पंतप्रधान मोदी हे देशाचे बाप आहेत', संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

हबीब WII मधल्या Department of Animal Ecology and Conservation Biology मध्ये संशोधक आहेत. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सोलापुरात नाणजमध्ये ज्या ठिकाणी आम्ही पाहणी केली तिथे काही दिवसांपूर्वी माळढोक दिसल्याचं लोक सांगतात. महाराष्ट्रात माळढोकसाठीचा सुयोग्य असा अधिवास मोठा आहे, पण माळढोकची संख्या मात्र फक्त 8 ते 10 असावी. त्यामुळे आमच्या सर्व्हेमध्ये माळढोक दिसला नसावा."

नाणजमध्ये काय चुकलं?

माळढोक शेतामध्ये फारशी काही नासधूस करत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांनी या पक्ष्यांना नुकसान पोहोचवण्याचं काही कारण नव्हतं, असं लोखंडे म्हणाले. पण सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका माळढोकला नक्कीच बसला आहे, असं ते म्हणतात.

Hope it was helpful.

Similar questions