Essay on lata mangeshkar in marathi language
Answers
भारत रत्न लता मंगेशकरांचा आवाज एवढा गोड आणि मधुर आहे कि त्यांना भारताची सुरसम्राज्ञी, भारताची कोकीळ अश्या विशेषणांनी स्मरण केले जाते. लता मंगेशकर प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक स्व. श्री पंडित दीनानाथजी मंगेशकर यांची थोरली मुलगी. ४ भावंडांपैकी लताजी ह्या सगळ्यात मोठ्या. त्यांना बालवयापासूनच गायनाचा छंद होता. त्यांनी आपल्या आयुष्यात जवळपास दहा हजारावरती गीते गायली आहेत. त्यांनी सुमारे तेरा भाषेतील चित्रपटामंध्ये गीत गायली आहेत. परंत मराठी,बांग्ला आणि हिंदी सिनेस्रष्टीत त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.
असे म्हटले जाते कि जेव्हा लता दीदींनी ये मेरे वतन के लोगो हा गीत तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या समोर गाईले तेव्हा ते अक्षरश रडत होते. अश्या आमच्या लताजी कित्येक तरुण गायक आणि गायिका यांचे प्रेरणास्थान बनले. त्यांनी हजारो चित्रपटात आपल्या गळ्याची किमया करून जगप्रसिद्धी प्राप्त केली. पण अहंकाळ त्यांच्या जवळ सुद्धा भटकू शकला नाही. लता ताईंना त्यांच्या भारतीय संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदानासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बीएफजेए पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक सिंगरसाठी फिल्मफेयर अवॉर्ड, फिल्मफेअर स्पेशल अवार्ड, फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार इ. भेट करून गौरवान्वित करण्यात आले. त्यांना पदम भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, पदम विभूषण भारत रत्न, legion ऑफ होनोऱ हे सन्मान हि देण्यात आले. लता ताई आज एकोन्नवद वर्षाच्या झाल्या आहेत, त्यांना उदंड आयुष्य लाभो हे ईश्वर चरणी प्रार्थना.