Essay on Leopard in Marathi.
बिबट्या मराठी निबंध
Answers
मार्जार कुळातील अत्यंत विलोभनीय असा हिमबिबट्या इंग्रजी भाषेत ‘स्नो लेपर्ड’ नावाने प्रसिद्ध असलेला हा प्राणी अत्यंत दुर्मिळ आहे, त्याला बघणारी व्यक्ती ही त्याहून दुर्मिळ आहे असे नक्कीच म्हणता येऊ शकते, त्याला कारण निश्चितपणे त्याच्या नैसर्गिक निवासस्थानाची उंची, जी ऋतूप्रमाणे बदलत असते. उन्हाळ्यात ते समुद्रसपाटीपासून ८९०० ते १९,७००फूट उंचीवर वास्तव्यास असतात, तर हिवाळ्यात ती ३९०० ते ६६०० फुटांवर येते. त्यामुळे इथवर जाणे हे मोठे धाडसच आहे. पर्वतीय प्रदेशातील व्यक्ती मात्र याला अपवाद आहे.
पर्वतीय क्षेत्रातील कुरण, खडकाळ प्रदेश ही हिमबिबट्याची आवडती वसतिस्थानं आहेत. बर्फाळ प्रदेशात अंदाजे ८५ सेंटीमीटर बर्फात पाय रोवून सहजपणे हा प्राणी चालू शकतो. त्याचा राखाडी रंग आणि त्यावरील ठिपके हे त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला अनुरूप असेच आहेत. ‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फेडरेशन’च्या आकडेवारीवरून सध्या हिंदुस्थानात ४५०-५०० संख्येत याचे अस्तित्व आहे. त्याची हिंदुस्थानातील नक्की संख्या मोजणे हे तसे एक दिव्यच आहे, कारण पश्चिमी हिमालय राज्यातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या पाच राज्यांत याचे वास्तव्य आहे, ते सुद्धा हिंदुस्थानच्या सीमेलगत. प्राण्यांना मानवाच्या सीमांचे बंधन नसल्याने त्यांचे नागरिकत्व कुठल्या देशाचे आहे हे ठरवणे जवळजवळ अशक्यच आहे, कारण आशियातील पर्वतीय प्रदेश असलेल्या राष्ट्रांत ‘स्नो लेपर्ड’चे ४ ते ७ हजार संख्येने अस्तित्व आहे.
बिबट्या मराठी निबंध :
बिबट्या हा मांजार कुळातील प्राणी आहे . हा प्राणी मोट्या प्रमाणात आढळून येतात .हे आकाराने लहान असतात . ते फक्त मांसभक्षक असतात . त्याच्या अंगावर काळे पोकळ ठिपके असतात . त्याची त्वच्या गडद सोनेरी रंगाची असते . त्याची शरीरयष्टी लांबसडक असते. हा प्राणी खूप वेगाने पळतो. तो एक चपळ शिकारी आहे. त्याचे वजन ९० किलो असते . बिबट्या मनुष्य वस्तीत राहतात. भारतात काळे बिबटे दाट जंगलात असतात. त्याचे खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी . पण ते उंदीर ,माकडे ,पक्षी व कीटक खातात. तसेच ते उभयचर प्राणी पण खातात.