Essay on Love in Marathi.
मराठी निबंध प्रेम
Answers
Answered by
16
Answer:
प्रेम करायला, कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही, अनाहूतपणे एकमेकांचे विचार, मने जुळली कि झाले प्रेम... माझे ही तसेच झाले, माझ्या प्रमाणे अनेकांचे झाले ही असेल. मी आणि ती एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात माझ्या गावापासून तिचे गाव पाच किलोमिटर पुढे असल्याने, रस्ताही एकच आणि येण्याजाण्यासाठी बसही एकच... हा एक निव्वळ योगायोग, सुरुवातीला तिच्या शेजारीही मी बसत नव्हतो, गाडीला गर्दी होत असल्याने मी ताटकळत उभा राहायचो. पंधरा दिवसानंतर तिला काय वाटले कुणास ठाऊक, तिने येतानाच, तिच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली, मात्र बसलो नाही, तिनेच बस ना, म्हटल्यावर अंग चोर बसलो... आणि त्या दिवसापासून सुरू झाला आमच प्रेमाचा काटेरी प्रवास.. एकाच बसमध्ये एकाच सिटवर बसून गप्पागोष्टीचे रुपांतर प्रेमात कधी झाले, हे कळालेसुद्धा नाही, गप्पा कितीही गर्दी असली तरी मी बेफिकीर असायचो, कारण माझी जागा धरणारी माझी ‘ती’ त्या गाडीत असायची. गप्पांच्या ओघात स्टँड कधि यायचे कळायचे ही नाही.
हा प्रवास संपूच नये असे वाटायचे. पण कोणत्याही गोष्टीस शेवट हा डरलेलाच असतो. आमच्या प्रेमाला ती बस तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी साक्षिदार होते पहिल्या प्रेमाचे... रविवारी ती येत नसल्याने, मन बेचैन व्हायचे, सोमवारी तिला पहिल्याशिवाय करमत नसायचे, गोड हसायची आणि गोड बोलायची, शिक्षण संपल्यावर जिवनसाथी बनण्याच्या आणाभाका ही घेतल्या कॉलेज, कॉलेज कॅन्टीन, सगळीकडेच आमच्या प्रेमाच्या चर्चा आसायच्या,एस.टी.त पटवलेली पोरगी म्हणून चिडवायचे...
प्रेमप्रकरण वाढतच गेले, घरापर्यंत गेले आणि सुरू झाला काटेरी प्रवास.. तिचे कॉलेज बंद झाले, माझ्या बापाने, भावाने मुलीचा तपास काढला, आणि प्रेमाला विरोध सुरू झाला. तिच्या घरच्यांनी तिच्या काही माझ्याबरोबर लग्न करण्याचे ठरवले. ते स्वत:हून घरी ही आले, पण माझ्या घरच्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला, मी काहीच बोलू शकलो नाही.
अपराध्यासारख्या आमच्या नकारा नंतर मात्र तिच्या साठी स्थळ शोधू लागले. परीक्षा ही दिली नाही, शिक्षण आणि प्रेम... अर्ध्यावरच सुटले, माझ्यामुळेच... आणि तिचे लग्न झाले... आणि आडवले ते तिने केलेले पहिले प्रेम.. लग्नानंतर ब-याच महिन्यानंतर मी माझ्या गावच्या पाटीवर उभा होतो... माझ्या बापाने मला टमटम घेऊन दिले होते, टमटम मध्ये बसलो असतानाच पांढ-या शुभ्र रंगाची एक अलिशान गाडी आली आणि पाटीवर थांबली, गाडीचे काच खाली झाले आणि त्यात ती दिसली. पांढ-या शुभ्र पंजाबीवर, बॉब कट केलेली अगदी परिसारखी दिसणारं माझं पहिलं प्रेम होतं ते... मी मात्र मान खाली घातली तिच्याकडे पाहण्याचेही धाडस झाले नाही, तिचा नवरा इंजिनियर होता. तिचे चांगले झाल्याचे मनोमन समाधान होते. मी मात्र तिला धोका दिला होता ती दिसली आणि पुन्हा पहिल्या वहिल्या प्रेमाची आठवण झाली.
HOPE IT HELPS....
PLEASE MARK AS BRAINLIEST...
PLEASE...
Answered by
35
मराठी निबंध प्रेम :
प्रेम म्हणजे माया, ममता, प्रीति, आवड. प्रेम ज्यातुन सुख, समाधान, शांती मिळते असे. प्रत्येक व्यक्तीचे कोणावर तरीही प्रेम असते जसे आईचे आपल्या मुलांवर, आपल्या कुटुंबावर प्रेम असते हे खरे पवित्र प्रेम आहे. तसेच मुलांचे पण आपल्या आईवर प्रेम असते.आईचे प्रेम म्हणजे माया, ती तिच्या मुलांवर निस्वा:र्थ मनाने प्रेम करते. तिच्या प्रेमाला सिमाच नसते. प्रेम ही एक भावना आहे, ती प्रत्येकाच्या मनात असते. प्रेमाला मैत्री पण म्हणता येईल. दोन चांगल्या मित्रांमध्ये सुध्दा एक प्रकारची आपुलकीची भावना असते. प्रेम हे फक्त व्यक्तीवरच करत नाही तर ते प्राणी, वस्तु वर सुध्दा करता येते. प्रेम हे नेहमी निस्वा:र्थी भावनेने करावे. पण म्हणजे घेणे नव्हे तर देणे असा होतो.
Similar questions