World Languages, asked by mahek1808, 11 months ago

essay on marathi in surya mavarlach nahi tar​

Answers

Answered by VanishaSingh
1

Answer:

सूर्य उगवला नाही तर असा विचार पण आपण करू शकत नाही. कारण सूर्य उगवला नाही तर आपली सगळी कामे होणार नाहीत. माणसाला जगायला जसे हवा, पाणी, निवारा यांची गरज आहे तशीच सूर्याची देखील गरज आहे. सूर्य उगवणे व मावळणे ही नैसार्गिक क्रिया आहे. ही क्रिया होणार नाही असे होणार नाही. परंतु जर का असे झाले तर मानवाचे जगणे कठीण होईल. ऊन, पाऊस आणि हवा ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यातील कोणतीही गोष्ट नसेल तर संसाराचा ताळमेळ बिघडून जाईल.

लहान मुलांना जर सूर्य उगवला नाही तर चालेल का? हा प्रश्न विचारला तर त्यांना ह्या प्रश्नाची गंमत वाटेल. ते कदाचित असे म्हणतील की चालेल कारण त्यांना असे वाटेल की सूर्य उगवला नाही तर आपल्याला शाळेला सुट्टी मिळेल. पण त्या लहान मुलांना सूर्याचे महत्व माहित नसते. पण ते आपल्याया त्यांना समजवावे लागणार. सूर्य उगवला नाही तर झाडांना ऊन कोठून भेटणार. झाडांना जगण्यासाठी व मोठे होण्यासाठी जसे पाणी घालावे तसेच त्यांना सुर्याप्रकाश पण आवश्यक आहे.

Similar questions
Math, 11 months ago