India Languages, asked by shubhadathakare1357, 7 months ago

Essay on mazhi aai in marathi plss it's urjent​

Answers

Answered by shayujya
1

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई मराठी निबंध मराठी बघणार आहोत. या लेखामध्‍ये पुर्ण ४ वेगवेगळे निबंध देण्‍यात आले आहे. या निबंधामधे आईचे आपल्‍या मुलाविषयी व्‍यक्त होणारे प्रेम व मुलांच्‍या फायद्यासाठी स्‍वता केलेला त्‍याग, आईचे मुलासोबत असलेल्‍या प्रेमळ नात्‍याचे वर्णन यात निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया माझी आई मराठी निबंधाला.

आईपुढे स्वर्गाचीही महानता कमी पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही." माझी आईही अगदी अशीच आहे.

आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्‍यास पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्‍येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते.

मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. (हे पण वाचा माझे बाबा मराठी निबंध)

ती स्वतः एम्. एस्सी.(M.Sc) असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी.(Ph.D) केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.

माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.

आई या शब्द साधा सरळ असुनसुध्दात त्यात पुर्ण जगाची माया ममता दडलेली आहे. बालपणापासुन लाडाने खाऊ पिऊ घालणारी आई ही साक्षात अन्न‍पुर्णा देवी आहे. आपण आजारी पडल्यावर आई रात्रभर जागुन आपली सेवा करत असते. आईचा स्वभावच वेगळा असतो ती कधी प्रेम करते तर कधी रागावते पण नेहमीच आपल्यात मुलांच्या भल्याचाच विचार करते .

खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थांबतील.

hope it's useful for all....

please mark brainlaist....

follow me.....

Answered by shruti22mokal92
1

नमस्कार मंडळी तर आम्ही आपल्याला सांगणार माझ्या आईबद्दल बदल माझी आई मला खूप प्रेम करते माझ माझ्या आईचा आज मी तुला आम्हाला वर्णन सांगणार आहे माझी आई रोज सकाळी उठते रोजा स्तोत्र म्हणते गावाला उठवते मला आणि माझ्या बाबांना आणि मग नंतर माझी आई नाश्ता नाश्त्यामध्ये आमच्याकडे रोज वेगवेगळे पदार्थ काय करायचे भांडी खुप होतात म्हणून माझे कमीतकमी भांड्यात चांगले चांगले पदार्थ बनवते नंतर तर खूप थकून जाते मग ती थोडावेळ झोपते आणि मग मी तिला मदत करते तिथे अन् पाय दाबून देते माझे डोके दाबून देते आणि मदत भांडी घासते मला माझ्या आईची सेवा करायला खूप आवडते माझी आई खूप छान चांगली आहे

like please follow

Similar questions