essay on me va maze kartavya in marathi
Answers
Answered by
5
मी आणि माझे कर्तव्य
समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडणं हे अध्यहृत असतं.
वैयक्तिक कर्त्यव्ये म्हणजे कुटुंबाचे पालन पोषण करणे, घरातल्या सगळ्यांची काळजी घेणे आणि येणाऱ्या नवीन पिढीवर चांगले संस्कार करणे. सामाजिक कर्तव्ये म्हणजे समाजाप्रती आदरभाव असणे.
मी समाजासाठी उपयुक्त गोष्टी करेन किंवा किमान उपद्रव होणार नाही याची काळजी घेईन. समाजात राहताना शेजारी पाजारी, सहकर्मचारी, सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या प्रति आदर आणि प्रेम दाखवेन. .
रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणार नाही. आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील याकडे लक्ष ठेवेन. महानगरपालिकेने कचराव्यवस्थापनाचे घालून दिलेले नियम पाळेन. समाज आणि पर्यायाने देशाच्या उद्धारासाठी काम करेन.
Similar questions