essay on mi kelela jungle prawas
Answers
Answer:
ट्रेकिंग आणि वाइल्ड लाइफ वाचिंग हा माझ्या यजमानांचा आवडता छंद आहे. सांगायचंच म्हटलं तर अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी हे दोन्ही छंद जोपासले आहे. यावेळेला जंगलाचा राजा म्हणजेच सिंहाला बघायचं ठरवलं. सिंह बघायला जायचं म्हटल्यावर भारतामध्ये एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे गीरचं जंगल. जंगलाच्या राजाला जवळून बघायचं आणि ते पण जीपमधून म्हणजे दुर्मिळ योगायोगच नव्हे. नुसता कल्पनेनेच अंगावर शहारे यायला लागले. ट्रेकिंग आणि वाइल्ड लाइफ वाचिंग हा माझ्या यजमानांचा आवडता छंद आहे. सांगायचंच म्हटलं तर अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी हे दोन्ही छंद जोपासले आहे. यावेळेला जंगलाचा राजा म्हणजेच सिंहाला बघायचं ठरवलं. सिंह बघायला जायचं म्हटल्यावर भारतामध्ये एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे गीरचं जंगल. जंगलाच्या राजाला जवळून बघायचं आणि ते पण जीपमधून म्हणजे दुर्मिळ योगायोगच नव्हे. नुसता कल्पनेनेच अंगावर शहारे यायला लागले. प्रथमत: ही माझी कल्पना माझी मुलं शर्वरी आणि आर्य यांना सांगितली. ते तर आनंदाने नाचायलाच लागले. मग दिवाळीनंतर गीरच्या जंगलात जायचं ठरलं.
अखेर नोव्हेंबरमध्ये सौराष्ट्र जनता एक्सप्रेसने निघालो. गाडीमध्ये बसल्यावर सारखे सिंहाचेच विचार येत होते. दुसऱ्या दिवशी आम्ही राजकोटला पोहोचलो. गीर येथील जंगल रिसोर्ट बघून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही एकूण ४ सफारी बुक केल्या होत्या. जेवण करून आम्ही दुपारी २.३० वा. सफारीला निघालो. उघड्या जीपमध्ये जंगलात फिरण्याची मजा काही औरच असते. सर्पगरुड, कोतवाल, बहिरी ससाणा व इतर पक्षी आवर्जून पाहायला मिळाले. वाटेत आम्हाला बार्किंग डिअर, वाइल्ड गोअर, माकड, सांबर, ससा, साप, मुंगूस यांचं दर्शन झालं. पण एवढ्या वेळेत सिंह दिसला नाही म्हणून आम्ही सगळेजण निराश झालो होतो. पण प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण आम्हाला येथे लागू पडली. अखेर परतीचा प्रवास सुरु करणार तेवढ्यात आम्हाला जंगलाचा राजा सिंह याचं दर्शन झालं. साक्षात जंगलाचा राजा आमच्यासमोर उभा बघून आम्ही अचंबित झालो. एकूण ११ सिंह-सिंहीण व बछडे असे ते दिमाखात उभे होते. फोटो घेत व नजरेत सिंहांना साठवत काही १५ मिनिटे झाले हे कळलंच नाही. शेवटी आम्ही तेथून आमच्या हॉटेलकडे निघालो. दुसऱ्या दिवशीच्या सफारीमध्ये आम्हाला अजून सिंह, बिबट्या व मगर दिसले. आमच्या चार दिवसांची सफर कधी संपली आम्हाला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही तेथून दिव व सोमनाथला गेलो व सौराष्ट्र मेलने परत आलो. खरंच वर्षातून एकदा तरी सगळ्यांनी वाइल्ड लाइफ टूर करायला हवी.
Explanation:
❌❌hello mates ❌❌
प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. कोणाला खाण्याचा तर कोणाला कपड्याचा. मला मात्र जंगलातल्या प्रवासाचा छंद आहे, कारण निसर्गाशी माझं नातं आहे. मग ते जंगल कितीही मोठं असलं, त्यात कितीही जनावरं असली तरी त्याचा आनंद वेगळाच!
ह्या जंगलातून फिरताना खूप काही शिकता येतं. झाडांशी बोलता येतं, पक्ष्यांचे आवाज, निसर्गाची साथ हे सगळं आपल्याला काँक्रीटच्या जुंगलापासून दूर नेत...