India Languages, asked by simrankhatana5896, 10 months ago

Essay on my favorite city Pune in Marathi

Answers

Answered by Friendship11
1

pune is the beautiful city ..its has alot of fancy shops

Answered by halamadrid
4

■■माझे आवडते शहर आहे पुणे■■

माझे आवडते शहर आहे पुणे. मी माझ्या कुटुंबासोबत पुण्यातच राहते.मला माझ्या शहरावर खूप प्रेम आहे.

पुण्यात भरपूर आई.टी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे, इतर शहरांमधून अनेक लोक आणि तरूण, माझ्या शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी येतात. पुण्यात खूप वेगवेगळे हॉटेल, डिस्को आहेत, जिथे लोकांचे मनोरंजन होते.

पुण्यापासून वेगवेगळे हिल स्टेशन, समुद्रकिनारे, किल्ले आणि इतर फिरायचे ठिकाण काही अंतरावर आहेत. पुण्यापासून हे ठिकाण जवळ असल्यामुळे, मी माझ्या कुटुंबासोबत सुट्टीत तिथे फिरायला जाते.

पुण्यात विविध खाद्यपदार्थाचे प्रकार मिळतात. तसेच शॉपिंग चाहत्यांसाठी इथे विविध मॉल आणि स्थानिक बाजार आहेत.

पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. इथे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जातो. पुण्यात सगळे सण आनंदाने व उत्साहाने साजरा केले जातात.

माझे शहर खूप सुरक्षित आहे. मी बिंधास्तपणे रात्रीसुद्धा माझ्या मैत्रिणींसोबत, कोणाचीही भीती न बाळगता बाहेर फिरायला जाते. मला माझा शहर खूप आवडतो आणि मला माझ्या शहराचा अभिमान आहे.

Similar questions