Essay on my favourite season in marathi
Answers
◆◆माझा आवडता ऋतु(My favourite season):◆◆
माझा आवडता ऋतु आहे हिवाळा ऋतु.पावसाळ्यानंतर येणारा हिवाळा ऋतु ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यांपर्यंत असतो. या ऋतुमध्ये दिवस लहान आणि रात्र मोठ्या असतात.सगळीकडे थंडीचे वातावरण असते.
हिवाळ्यात, भारतामध्ये काही भागात बर्फ पडतो.हिवाळ्यात होळी, दिवाळी, नाताळ असे बरेच सण येतात. डोंगराळ क्षेत्रात फिरायला आणि बाहेर जाऊन पिकनिक करण्यासाठी हा ऋतु उत्तम असतो.
थंड वाऱ्यामुळे लोकांची पंचाईत तर होतेच,पण उन्हाच्या त्रासापेक्षा ही थंडी लोकांना जास्त आवडते.या ऋतुत गरम गरम कॉफी,चहा,सूप प्यायची मजाच वेगळी असते.हिवाळ्यात भरपूर ताज्या भाज्या आणि फळे खायला मिळतात.
हिवळ्यात थंड वातावरणामुळे सर्दी,खोकला,ताप ययची भीती असते.थंडीपासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकारचे स्वेटर,मफलर,शाल वापरतात.काही लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर शेकोटी पेटवतात.
जास्त पावसामुळे तसेच उन्हाळ्यामुळे लोकांना खूप त्रास होतो,म्हणून हिवाळा हा माझा सगळ्यात आवडता ऋतु आहे.