India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on Nature in Marathi: (मराठीतील निसर्गावरील निबंध)

Answers

Answered by Mandar17
7

निसर्ग हा माणसाचा अगदी निकटचा मित्र आहे. निसर्गाने मनुष्याला सर्व काही प्रदान केलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात मनुष्याला आरोग्य, शांती आणि सर्व क्लेशापासून सहज मुक्ती मिळते.  

निसर्गाची किमया शब्दांद्वारे व्यक्त केली जाऊ शकत नाही. ह्या पृथ्वी ग्रहावर सर्व प्राण्यांना जिवंत राहण्यासाटी आवश्यक असलेले मूलभूत घटक प्रकृतीने निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला दिले आहे. निसर्गाने ह्या पृथ्वीतलावर मानवाला हिरवेगार झाडांचे, फळांचे, फुलांचे, विविध पशु,  पक्षी, किट,  नद्या, इत्यादींचे साहचर्य प्रदान केले आहे. विविध प्रकारचे खनिजे, वायू, रसायने निसर्गाच्या सानिध्यातूनच आपलाल्याला प्राप्त होत असते. आपल्या जीविताचे आणि वैभवतेचे संपूर्ण भार निसर्गावरच अवलंबून आहे.  

एवढ्या प्रेमळ आणि उदार निसर्गावर मनुष्य क्रूर वैऱ्यासारखा आघात करत आहे. आपल्या स्वार्थसिद्धीसाठी मनुष्याने वने तोडून कित्येक नैसर्गिक भाग ओसाड करून टाकला आहे. आज जे ग्लोबल वॉर्मिंग चे दैत्य सर्व संसाराला सतावत आहे ते नुसते निसर्गावर केलेल्या मानवी क्रूरतेचेच भीषण परिणाम आहे. जर आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला सुखी, समृद्ध आणि निरोगी आणि तेवढ्याच जिवंत बघायचे असेल तर आपल्याला आतापासूनच निसर्गाचा सानिध्यात जावे लागेल आणि निसर्ग संवर्धनाची वाट जोपासावी लागेल.

Answered by annukanojiya1976
1

Answer:

good evening to you and happy

Similar questions