India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on Nisarg maza sobati in Marathi.
निसर्ग माझा सोबती मराठी निबंध

Answers

Answered by IronLion
291

निसर्ग हा दानशूर आहे. परंतु निसर्ग बोलत नाही. पण कृती करतो.मित्र हा दु:खात आणि सुखात सहभागी होतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही. आपल्या समाजात विषमता आहे. माणूस विषमतेने वागतो. परंतु निसर्ग विषमतेने वागत नाही. म्हणूनच निसर्ग ह मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो.

झाडं, नदी, समुद, पाणी, रंग, निसर्गाने खूप किमया केली आहे. 'सोनचाफा'फुलामध्ये नाही का, पिवळ्या रंगााच्या पाकळ्या आणि त्याचा देठ हिरवा.

म्हणून मला निसर्गाविषयी असे म्हणावेसे वाटते,

अनंत हस्ते कमला वराने (निसर्गाने)देता घेशील दो कराने.निसर्ग जो आपल्याला भरभरून देत असतो.ते घ्यायला आपले दोन इवले हात अपुरे पडतात

Answered by Haezel
475

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध :

निसर्ग हा मानवाला मिळालेला सर्वात दान शूर मित्र  आहे. निसर्गाने आपल्याला खुप काही देतो. निसर्गाचा मानवाच्या प्रगतीत खुप मोठा वाटा आहे.  निसर्ग हा नेहमी आपल्या सोबत राहतो म्हणुन तो आपला सोबती आहे. तो आपल्याला खुप काही देत असतो फळे, फुले, धान्य, लाकूड असे बरेच काही देतो पण त्या बदल्यात आपण त्याला काही देत नाही . त्याची  नि:स्वार्थाची भावना असते. ही खुप सुंदर गोष्ट आपण निसर्गा कडुन शिकली पाहिजे. निसर्ग हा एखाद्या मित्रासारखी साथ देतो. तो आपले संरक्षण करतो. आपल्याला उत्तम आरोग्य देतो. आपले संगोपन करतो. याठिकाणी निसर्ग हा आपल्या पालकासारखा वागतो. पण मनुष्य आता खुप प्रगत  झाला आहे त्याच्याकडे सगळे काही आहे पण तो आता निसर्गाला विसरला असे काहीसे म्हणता येईल. वेगवेगळे ऋतु ,प्राणी, वनस्पती, नद्या, नाले, झरे, पर्वत रांगा, पाऊस, अशा शेकडो गोष्टी या निसर्गात आहे. निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे, तो आपला एक आयुष्यभराचा सोबती आहे.

Similar questions