India Languages, asked by mehul2403, 11 months ago

essay on पाऊस पडला नाही तर​

Answers

Answered by Anonymous
21

पाऊस पडला नाही तर

Explanation:

वर्तमानपत्र  वाचत  असताना  मला  एक  गोष्ट  जाणवली  कि  प्रत्येक  दिवशी  शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांच्या  बातम्या   येतात .  त्या  कशामुळे   ? माझ्या  वडिलांनी  सांगितलं  कि  ते  कर्ज  फेडू  शकत  नाही . पण  ते  हे  कर्ज  का  फेडू शकत  नाहीत ? मी  आईला  विचारले  तर  ती म्हणाली  कि  पाउस  न  पडल्यामुळे  पीक  येत नाही  मग  धान्य  बाजारात  विकू  शकत  नाही ज्यामुळे  रक्कम  मिळत नाही  आणि  कर्ज  ही  भारता येत  नाही . याचा  अर्थ  की  पाउस  माणसावर  रुसला  असेल . जर  खरच  पाउस  रुसला तर !                          पाउस  पडला नाही तर आपण पिणार काय ? पाणी नसेल तर आपण स्वच्छ  कसे  होणार ? पाणी  नसेल तर पशु - पक्षी  जगणार कसे ? झाडांना  पाणी  नाही मिळालं  तर  ते   फळ   नाही  देऊ  शकणार  मग  आपण  कोणाकडे  आशेने  पाहायचे ? तो  पर्यंत  माझ्या मनात एक विचार चमकला .                           पाण्याच्या जागी आपण पेप्सी , स्प्राईट , को -को  कोला  असे  कॉल्ड ड्रिंक  पीऊ  शकतो . किती गंमत  ना !पेप्सीची  आंघोळ ! स्प्राईट चे  पाणी ! स्वीमिंगपूल मध्ये पाण्या ऐवोजी  को-को  कोला ! खरच  मजा  येईल  ना ! यातील  विनोद  सोडला  तर  पाण्याविना  माणसाचे  हाल -हाल  होतील .                           संत  तुकाराम  महाराज  म्हणतात : " वृक्षवल्ली  अम्हा  सोयरे  वनचरे  । " अर्थात  वृक्ष  आपले  सखे  आहेत . पण जर या वृक्षांना  वाढवण्यासाठी पाणीच नसले तर  काय करायचे ? मनुष्य जे  आतापर्यंत  सूर्याला  प्रणाम  करत आहेत ते  भविष्यात जाऊन  त्याला  सुर्य  नारायण  म्हणणार  का ? सूर्याच्या  उष्णतेने जमीन तप्त  होऊन  पाण्याच्या थेंबासाठी  आतूर  असेल  आणि  जे  काही  थेंब  तिला  मिळणार  ते म्हणजे  लोकांचे  अश्रुरूपी  स्वेद  असणार .                          पाण्याशिवाय  सृष्टी  अचल  होणार . त्यावेळेस ," लोक  पाण्यासाठी  रडणार  नाही , तर पेटणार !"                          पाण्यासाठी  भिक मागावी  लागेल . अश्रू येण्यासाठी  देखील  पाणी  राहणार  नाही . लोकांना  नीट  रडतही  नाही येणार . अशा  वेळी  देवाशिवाय  कोणी वाचवू  शकणार  नाही . पण त्यावेळी  देवाकडे आशेने  बघणार  का ? त्याच्यावर विश्वास  ठेवणार  का ? देव  त्यांना  मदत  करणार का ? भुकेने  कण्हणारे  लोक  आत्महत्या  हाच  पर्याय  तर नाही  स्वीकारणार  ना ? ही  सृष्ठी  कोरडी नाही राहणार  ना ?तहानलेल्या  माणसांवर  निसर्ग  दया  करणार  की  नाही ?                          हा  विचारच किती भयंकर  आहे ना ! आपण तर  एकदा  आंघोळ  नाही  केली  तरी किती  बेचैन  होतो . पण  जर एकदा  पाणीच  मिळायचे  बंद झाले  तर ? आंघोळ  लांब ची  गोष्ट , पाण्याच्या थेंबासाठी  तडपणार  लोकं !                         खरच पाणी  माणसासाठी  अमृत  आहे . म्हणून  माणसाने  या  अमृताचा  उपयोग  योग्यपणे  करायला  हवा . आज  आपल्याला पाणी  मिळत  आहे हे  निसर्गाचे  वरदानच !

.

Answered by Amy547
26

hope it helps

आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये पाण्याचे सर्वत मोठे स्थान आहे. कारण कोणताही सजीव म्हणजेच मानव असू दे किंवा पक्षी – प्राणी असू दे. कोणीही सजीव या पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. मानव एक वेळ अन्नाशिवाय जगू शकतो.

परंतु पाण्याशिवाय एक दिवस सुद्धा जगू शकत नाही. मानवी जीवन हे संपूर्णपणे पाण्यावरच अवलंबून आहे. म्हणून पाणी हेच जीवन आहे असे म्हटले आहे. म्हणून पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी व धरतीवरील पाणी साठवून ठेवण्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे.

या पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे – पाऊस होय. जर एकदा असे झाले की, सर्व सजीव सृष्टीला आवश्यक असणारा हा पाऊस पडलाच नाही तर ? जर हा पाऊस पडलाच नाही तर मानव आणि इतर सजीवांचे जीवन कोलमडून जाईल.

Similar questions