essay on पाऊस पडला नाही तर..
Answers
■■पाऊस पडला नाही तर!!■■
पाऊल खूप महत्वपूर्ण आहे आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी केला जातो.तेव्हा, पाऊस पडला नाही तर, लोकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागेल.
पाऊस पडला नाही तर, नदी,विहीर,धरणे,नाले सगळे काही सुकून जातील. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.
पाऊस पडला नाही तर, आपल्यासोबतच इतर सजीवांच्या स्वास्थ्यावर सुद्धा गंभीर परिणाम होतील. सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. झाडे हळूहळू मरू लागतील. परिसरातील हिरवळ गायब होऊ लागेल.
अन्न पिकवण्यासाठी आवश्यक मात्रेत पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतील. धान्याचा साठा कमी असल्यामुळे, त्याचे भाव वाढत जातील.
ज्या गरीबांना वाढलेल्या किंमतीत धान्य खरेदी करता येणार नाही, ते उपाशी राहतील. उपासमार व आजारामुळे त्यांना आपले जीव गमवावे लागेल.
पाऊस पडला नाही तर, उद्योगधंद्यावर वाईट परिणाम होईल.पाण्याचा उपयोग प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कामासाठी केला जातो. पाणी नसले तर ही कामं कशी होतील. पाऊस नसल्यावर, मच्छिमारांचा फार नुकसान होईल.
पाऊस पडला नाही तर, सगळ्यांचे फार नुकसान होईल.म्हणून पाऊस तर पडायलाच हवा.