Hindi, asked by unfortunately, 1 year ago

Essay on paus padla nahi tar in marathi language

Answers

Answered by AbsorbingMan
31

वर्तमानपत्र  वाचत  असताना  मला  एक  गोष्ट  जाणवली  कि  प्रत्येक  दिवशी  शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांच्या  बातम्या   येतात .  त्या  कशामुळे   ? माझ्या  वडिलांनी  सांगितलं  कि  ते  कर्ज  फेडू  शकत  नाही . पण  ते  हे  कर्ज  का  फेडू शकत  नाहीत ? मी  आईला  विचारले  तर  ती म्हणाली  कि  पाउस  न  पडल्यामुळे  पीक  येत नाही  मग  धान्य  बाजारात  विकू  शकत  नाही ज्यामुळे  रक्कम  मिळत नाही  आणि  कर्ज  ही  भारता येत  नाही . याचा  अर्थ  की  पाउस  माणसावर  रुसला  असेल . जर  खरच  पाउस  रुसला तर !                          पाउस  पडला नाही तर आपण पिणार काय ? पाणी नसेल तर आपण स्वच्छ  कसे  होणार ? पाणी  नसेल तर पशु - पक्षी  जगणार कसे ? झाडांना  पाणी  नाही मिळालं  तर  ते   फळ   नाही  देऊ  शकणार  मग  आपण  कोणाकडे  आशेने  पाहायचे ? तो  पर्यंत  माझ्या मनात एक विचार चमकला .                           पाण्याच्या जागी आपण पेप्सी , स्प्राईट , को -को  कोला  असे  कॉल्ड ड्रिंक  पीऊ  शकतो . किती गंमत  ना !पेप्सीची  आंघोळ ! स्प्राईट चे  पाणी ! स्वीमिंगपूल मध्ये पाण्या ऐवोजी  को-को  कोला ! खरच  मजा  येईल  ना ! यातील  विनोद  सोडला  तर  पाण्याविना  माणसाचे  हाल -हाल  होतील .                           संत  तुकाराम  महाराज  म्हणतात : " वृक्षवल्ली  अम्हा  सोयरे  वनचरे  । " अर्थात  वृक्ष  आपले  सखे  आहेत . पण जर या वृक्षांना  वाढवण्यासाठी पाणीच नसले तर  काय करायचे ? मनुष्य जे  आतापर्यंत  सूर्याला  प्रणाम  करत आहेत ते  भविष्यात जाऊन  त्याला  सुर्य  नारायण  म्हणणार  का ? सूर्याच्या  उष्णतेने जमीन तप्त  होऊन  पाण्याच्या थेंबासाठी  आतूर  असेल  आणि  जे  काही  थेंब  तिला  मिळणार  ते म्हणजे  लोकांचे  अश्रुरूपी  स्वेद  असणार .                          पाण्याशिवाय  सृष्टी  अचल  होणार . त्यावेळेस ," लोक  पाण्यासाठी  रडणार  नाही , तर पेटणार !"                          पाण्यासाठी  भिक मागावी  लागेल . अश्रू येण्यासाठी  देखील  पाणी  राहणार  नाही . लोकांना  नीट  रडतही  नाही येणार . अशा  वेळी  देवाशिवाय  कोणी वाचवू  शकणार  नाही . पण त्यावेळी  देवाकडे आशेने  बघणार  का ? त्याच्यावर विश्वास  ठेवणार  का ? देव  त्यांना  मदत  करणार का ? भुकेने  कण्हणारे  लोक  आत्महत्या  हाच  पर्याय  तर नाही  स्वीकारणार  ना ? ही  सृष्ठी  कोरडी नाही राहणार  ना ?तहानलेल्या  माणसांवर  निसर्ग  दया  करणार  की  नाही ?                          हा  विचारच किती भयंकर  आहे ना ! आपण तर  एकदा  आंघोळ  नाही  केली  तरी किती  बेचैन  होतो . पण  जर एकदा  पाणीच  मिळायचे  बंद झाले  तर ? आंघोळ  लांब ची  गोष्ट , पाण्याच्या थेंबासाठी  तडपणार  लोकं !                         खरच पाणी  माणसासाठी  अमृत  आहे . म्हणून  माणसाने  या  अमृताचा  उपयोग  योग्यपणे  करायला  हवा . आज  आपल्याला पाणी  मिळत  आहे हे  निसर्गाचे  वरदानच !



Answered by halamadrid
12

■■पाऊस पडला नाही तर■■

पावसाळा हा बऱ्याच जणांचा आवडता ऋतु आहे. पावसाचा आगमन होताच लोक आनंदाने नाचू लागतात. पावसाच्या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी व विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. अशा वेळी, पाऊस पडला नाही तर आपल्याला खूप संकटांना सामोरे जावे लागेल.

पाऊस पडला नाही तर,नदी,विहीर,धरणे,नाले सगळे काही सुकून जातील. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.

पाऊस पडला नाही तर, आपल्यासोबतच इतर सजीवांच्या स्वास्थ्यावर सुद्धा गंभीर परिणाम होतील. सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. झाडे हळूहळू मरू लागतील. परिसरातील हिरवळ गायब होऊ लागेल.

अन्न पिकवण्यासाठी आवश्यक मात्रेत पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतील. धान्याचा साठा कमी असल्यामुळे, त्याचे भाव वाढत जातील.

ज्या गरीबांना वाढलेल्या किंमतीत धान्य खरेदी करता येणार नाही, ते उपाशी राहतील. उपासमार व आजारामुळे त्यांना आपले जीव गमवावे लागेल.

पाऊस पडला नाही तर, उद्योगधंद्यावर वाईट परिणाम होईल. पाणी नसले तर उद्योगधंद्यामधील कामं कशी होतील? पाऊस नसल्यावर, मच्छिमारांचा फार नुकसान होईल.

पाऊस पडला नाही तर, सगळ्यांचे फार नुकसान होईल.म्हणून पाऊस तर पडायलाच हवा.

Similar questions