Essay on pollution in Marathi
Answers
____________________________
10 Lines on Pollution in Marathi Language Essay, Speech | प्रदूषण एक समस्या विषयावर १० ओळी निबंध मराठीमध्ये by Sueniel2018-09-26 Pexels.com मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे गृहपाठ दिले जातात जसे कि ५ ते १० ओळीत निबंध,भाषण आणि परिच्छेद लेखन आणि यासाठी त्यांना वेगवेगळे विषय दिले जातात. आम्ही आधीच सामान्य गृहपाठांचा विषयांवर लेख लिहिले आहेत. हे निबंध/ओळी इयत्ता १,२,३,४,५, चा विद्यार्थ्यांसाठी सरळ आणि समजण्यास सोपे आहेत. या लेखामध्ये प्रदूषण एक समस्या या विषयवर आम्ही एक छोटा निबंध लिहिला आहे. इयत्ता ५,६,७,८,९,१०, इत्यादी वर्गाचा विद्यार्थ्यांना हा विषय निबंध लेखनासाठी येऊ शकतो. आमच्या मते तुम्ही विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुम्हाला हि माहिती उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते. प्रदूषण एक समस्या या विषयावर १,२,३,४,५ च्या विध्यार्थ्यांसाठी १० ओळी/वाक्यांमध्ये निबंध १. आपल्या शहरात खूप धूम्र प्रदूषण आहे. २. आम्ही शाळेमद्ध्ये जात असताना आम्हाला रस्त्या पलीकडचे काही दिसत नाही. ३. आमच्या विज्ञानच्या शिक्षकांनी सांगितले की याला धुके असे म्हणतात. ४.आमच्या शहरात दोन नद्या आहेत आणि दोन्ही हि खूप प्रदूषित आहेत. ५. नदीतल्या पाण्याचा वास सांडपाण्यासारखा येतो व पाणी काळ्या रंगाचे दिसते. ६. रस्त्यावर आणि नदीमद्ये खूप कचरा आणि प्लास्टिक आहे. ७. मला शिमला शहर खूप आवडते, तिथली हवा आणि पाणी खूप स्वछ आहे, ८.आपल्याला आपल्या खराब सवयी बदलाव्या लागतील नाहीतर आपले शहर कचरा पेटी सारखे दिसेल. ९. आपण आपल्या शाळेत, रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर कचरा नाही केला पाहिजे. १०. आपण आपल्या घरातला ओला कचरा व सुका कचरा वेगळे ठेवायला पाहिजे. ११. मला माझ्या शहराला आणि देशाला स्वछ करण्यास मदत करायला खूप आवडेल. १२. मला माझ्या शहराला भारतातले सगळ्यात स्वछ शहर म्हणून बघायला खूप आवडेल. प्रदूषण एक समस्या या विषय वर मराठी मध्ये १० ओळीत लहान निबंध,भाषण, परिच्छेद आपल्या शहरातील प्रदूषण वाढत चालले आहे. पुढे जाऊन आपले शहर कचरा पेटीत बदलू शकते. लोक रस्त्यावर थुंकतात, प्लास्टिक पिशव्या फेकतात, खाल्लेले पॅकेट रस्त्यावर फेकतात. आपल्याला शिस्त नाही. आपण आपल्या स्वतःचा हातांनी पर्यावरणाला आणि शहराला हानी पोचावतोय. कारखाने घातक धूर आकाशात सोडतात,गाड्या हि प्राण घातक धूर सोडतात. कारखाने त्यांचा रासायनिक कचरा आणि पाणी नदी आणि समुद्रात सोडतात. शहर आणि गावातले गटारे व नाले नदीला जुळतात. हे सगळे भारतात सरासपणे आहेत. सरकारने या विषयावर ठोस नियम, धोरणे, पाऊल उचलायला हवे. त्या बरोबर आपण आपल्या खराब सवयीहि बदलायला हव्यात. सरकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन हि समस्या सोडवायला हवी. आपल्याला स्वछ भारत अभियानात सहभागी झाले पाहिजे. शालेय विध्यार्थी म्हणून आपल्यालाहि हि मोहीम विजयी करण्यासाठी एकत्रित काम करायला हवे. आपण स्वच्छतेच्या महत्वा साठी सोशिअल मीडियाचा वापर करून जगाला सांगू शकतो. आपण वेगवेगळ्या अँप्स चा उपयोग करून प्रदूषण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करू शकतो. आपण क्लीन इंडिया वीकएंड शिबीर मध्येहि भाग घेऊ शकतो. आपण विद्यार्थ्यांनी अशी शपथ घेऊया कि आपण मोठ्यांसारखे गैरजबाबदार वागणार नाही. त्यांनी पर्यावरण स्वछ ठेवण्याकरीता काही नाही केले आणि आपल्याला हि या बद्दल काही शिकवले नाही. आपण नवी पिढीने ह्या मोहिमे मध्ये पुढाकार घ्याला हवा. आपण आपली शाळा, शहर, देश स्वच्छ बनवण्यास आपला संपूर्ण योगदान द्यायला पाहिजे. चला सगळ्यांनी शपत घेऊया कि आपण सगळे आपल्या देशाचे शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक बनू.
______________________________
❤️⭐I hope you mark as brainlist answer⭐❤️✨✨✨
Answer :
पृथ्वी 'आम्ही अनेक शतकांपासून या ग्रहामध्ये राहत आहोत. ही देवाची एक अद्भुत देणगी आहे. जर पृथ्वी नसती तर आपले जीवन शक्य झाले नसते. पृथ्वीवर मानवी जीवनासाठी आवश्यक असणारी सर्व आवश्यक तत्त्वे पृथ्वीवर आहेत. त्यामध्ये असे वातावरण आहे जे मानवांसाठी अत्यंत आवश्यक आहे. शतकानुशतके माणूस येथे राहत आहे. सुरुवातीला तो इतका शिक्षित आणि हुशार नव्हता. जसजसे ते पुढे गेले. त्याने पृथ्वीचे शोषण करण्यास सुरवात केली. त्याने आपली मर्यादा ओलांडली आणि त्याचे वातावरण आणि हे पृथ्वी विनाशाच्या कड्यापर्यंत पोहोचवले. माणसाच्या आरोग्यासाठी पर्यावरणाचे शुध्दीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. माणूस हा पर्यावरणाचे उत्पादन आहे. जेव्हापासून एखाद्याने निसर्गावर विजय मिळवण्याची मोहीम सुरू केली तेव्हापासून मनुष्याने निसर्गाचे नैसर्गिक सुख गमावले कारण मनुष्याने निसर्गाचा समतोल बिघडविला आहे, यामुळे आरोग्यास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.