essay on " रविवार नसते तर......."
Answers
ज्या ज्या देशावर कधी काळी ब्रिटिश सत्ता होती त्या त्या देशात रविवार हा सुटीचा दिवस असतो. शिक्षणसंस्था, कार्यालये आणि बँका या दिवशी बंद असतात.
एके काळी भारतात कामगारांना रविवारची सुटी नसे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत इ.स. १८८४मध्ये ’बाँबे मिल हँड्स’ ही भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यांनी त्या काळच्या फॅक्टरी कमिशनकडे अनेक मागण्या केल्या. त्यातली रोजच्या कामातली अर्ध्या तासाची जेवणाची सुटी आणि रविवारची साप्ताहिक सुटी या दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या. त्यासाठी २४ एप्रिल १८९० रोजी हजारो कामगारांचा मोर्चा निघाला होता. अखेर १० जून १८९० पासून दर रविवारची सुटी देण्याचे गिरणी मालकांनी मान्य केले. २०१५ साली १० जूनला या रविवारच्या सुटीचा १२५वा वर्धापन दिन साजरा झाला.
i hope i help you
⠀⠀⠀⠀⠀ रविवार नसता तर...
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. या दिवसाचे सगळे रूप, सगळे वागणे इतर दिवसांपेक्षा नक्कीच वेगळे. असा हा रविवार आठवड्याच्या वेळापत्रकातून हरवला तर...? तर सगळीच गंमत नाहीशी होईल.
'रोज रोज शाळा। मनाला येई कंटाळा।।' रविवारी शाळा नसते. त्यामुळे उशिरापर्यंत गादीवर लोळायला मिळते. मी जरा आळस केला की, आई रागावते. मात्र रविवारी ती म्हणते, “झोपू दया त्याला. रोज लवकर उठावे लागते." रविवारी दुपारी आई अभ्यास घेऊ लागली, तर बाबा म्हणतात, "अग आज रविवार, आज अभ्यासाला सुट्टी!" असा रविवार कोणाला आवडणार नाही?
रविवारी आईच्या कचेरीला सुट्टी असते. मग ती मस्त जेवण बनवते. दुपारी बाबांबरोबर बुद्धिबळ, कॅरम यांसारखे खेळ रंगतात. दर रविवारी आम्ही संध्याकाळी फिरायला जातो. कधी कधी दूर कुठे तरी. कधी कधी नातेवाईकांकडे जातो. मग बाहेरच जेवण, त्यांतही प्रत्येक वेळी वेगळेपणा असतो. असा हा रविवार संपला की, वाईट वाटते. मग रविवार नसेल, तर आठवडा कसा आवडेल?