Essay on school without discipline in Marathi
Answers
Explanation:
शालेय जीवनात शिस्त विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शिस्तीशिवाय आपण चांगले शिक्षण घेऊ शकत नाही. न शिकता आणि शालेय जीवनातील पुढील शिस्त न घेता विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकीर्दीत नंतर खर्च करावा लागतो. शालेय शिक्षणात, शिस्त हा नियमांचा आणि नियमांचा एक संचा आहे जो आपल्याला योग्य आचारसंहितेची आठवण करून देतो.
■■ शिस्त नसलेली शाळा■■
शाळेत आपल्याला शिस्तीचे पहिले धडे मिळतात.शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना लावली गेलेली शिस्त त्यांना आयुष्यभर उपयोगी ठरते.अशा वेळी,शिस्त नसलेल्या शाळेची कल्पनाच ऐकायला खूप विचित्र वाटते.
शिस्त नसणाऱ्या शाळेत शिकणारी मुले वेळेचे नियोजन शिकू शकणार नाही, ते त्यांच्या उद्दीष्टांविषयी लक्ष केंद्रित करू शकणार नाही, त्यांचा ध्येय गाठण्यासाठी ते मेहनत करणार नाही.
शिस्तीचे धडे न शिकल्यामुळे विद्यार्थ्यी मोठ्यांचा किंवा शिक्षकांचा आदर करणार नाही. ते लोकांसोबत आदराने बोलणार नाही. कामाच्या ठिकाणी व कौटुंबिक जीवनात शिस्तीचे खूप महत्व असते.शिस्तीचे धडे न शिकल्यामुळे अशा मुलांना आपल्या कामात यश मिळवणे खूप कठीण होईल. त्यांना लोकांकडून आदर मिळणार नाही.
शिस्त नसलेल्या शाळेत शिकल्यामुळे मुलांचा फार नुकसान होईल.त्यांच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होईल.
शिस्त नसणाऱ्या शाळेत पालक आपल्या मुलांसाठी एडमिशन घेणार नाही.म्हणून,प्रत्येक शाळेत शिस्त ही महत्वाची असून शाळेत शिस्त ही असायलाच हवी.