India Languages, asked by dppanda5098, 11 months ago

gungaurav samarambh essay marathi

Answers

Answered by halamadrid
7

■■आमच्या शाळेत आयोजित केलेला गुणगौरव समारंभ■■

दहावीच्या परीक्षेत उत्तम प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या शाळेत गुणगौरव समारंभ ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दुसऱ्या शाळेतील मुलांना सुद्धा बोलवण्यात आले होते.

गुणगौरव समारंभाची तारीख शेवटी ठरली.त्याआधी आठवडाभर सर्वजण कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला लागले होते. गुणगौरव समारंभाचा दिवस हळूहळू जवळ आला.आदल्या दिवशी तालीम घेतली गेली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.संपूर्ण सभागृह भरले होते.दहावीच्या मुलांसोबत त्यांचे आईबाबा आले होते.सभागृह सजवले गेले होते. रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या.सर्वजण खुशीत होते.

सगळ्यात आधी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे व प्रमुख अतिथिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले.त्यानंतर मुख्याध्यापकांनी व प्रमुख अतिथि यांनी भाषण दिले आणि दहावीच्या मुलांचे अभिनंदन केले.

आमच्या शाळेच्या हर्षदा टीचर, दहावीच्या मुलांनी पुढे काय करावे,कोणते विषय निवडावे याबद्दल त्या दोन शब्द बोलल्या.जॉनने संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले.

थोड्या वेळाने पारितोषिक वितरण कार्यक्रम सुरु झाला.परीक्षेत चांगले प्रदर्शन दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले गेले.

सगळे कार्यक्रम छान झाले.लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता.सगळ्यांना आमचा कार्यक्रम खूप आवडला. सगळ्यांनी आमचे खूप कौतुक केले.

Similar questions