Essay on shetkaryache atmavrutta in marathi
Answers
Answered by
418
नमस्कार मित्रा,
★ शेतकऱ्याचे आत्मवृत्त -
रामराम मंडळी. मी कुलदीप, एक साधारण शेतकरी. आज मी तुम्हाला माझे आत्मवृत्त सांगणार आहे. माझा जन्म नंदुरबार ह्या छोट्याश्या गावी झाला. वडिलोपार्जित शेतीचा मीही मार्ग अवलंबला. पूर्ण आयुष्य मी शेतीसाठी वाहून दिले. शेती हेच माझ्या उदरनिर्वाहाचे साधन.
मी दिवसरात्र शेतात राबतो. काबाडकष्ट करतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधी भयंकर वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जातो. एवढे कष्ट करूनही माझ्या धान्याला भाव मिळत नाही. मग नाईलाजाने माझ्या बांधवांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो.
या कृषिप्रधान भारतात आम्ही शेतकरी पिकवतो तेव्हाच तुम्ही खाऊ शकतात. आम्ही पिकवतो मग आपण खातो. जर आम्ही शेतात काही पिकवले नाही तर काय खाणार तुम्ही? कधी विचार केलाय कसे जगणार तुम्ही?
मी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो. परंतु दोन वेळचे जेवणही नशिबात येत नाही ?
सरकारने आम्हाला कमी कर्जदरात खत, बियाणे, यंत्रणा उपलब्ध करून दिले, मालाला योग्य भाव दिला तरच आमचे आणि परिणामी तुमचे भविष्य चांगले आहे. आता तर मी म्हातारा झालोय. आता मुलबाळ शेती करतील. कमीतकमी त्यांच्यासाठी तरी परिस्थिती बदलावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद...

Similar questions
Computer Science,
8 months ago
Chemistry,
1 year ago
Science,
1 year ago
Biology,
1 year ago
Math,
1 year ago