Essay on teachers day in Marathi
Answers
शिक्षक दिन निबंध


Webdunia
प्रस्तावना
गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.
कधी आणि का साजरा केला जातो शिक्षक दिन
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. रशियाकडे भारताचे राजदूत बनण्यापूर्वी डॉ राधा कृष्णन उत्कृष्ट शिक्षक होते. ते सर्वप्रकारे एक आदर्श व्याख्याता होते आणि त्यांनी देशातील सर्व शिक्षकांना एक उच्च स्तर निर्माण करून दिला होता . म्हणून त्यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.
आम्ही देखील आमच्या शाळेत शिक्षक दिन साजरा करतो. आम्ही आमच्या शिक्षकांना त्या दिवशी त्यांच्या नित्यक्रमातून ब्रेक देतो. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी शिक्षक बनवले जाते . आणि त्यांना उर्वरित वर्गांना शिकवायला संगितले जाते . सगळे शिकवणीचे तास आटोपल्यानंतर मग स्वागत सोहळा आयोजित केला जातो .
नंतर फुले व रांगोळीसह रंगीबेरंगी सभागृहात शिक्षकांचे स्वागत केले जाते. मग आम्ही खासकरुन त्यांच्यासाठी तयार केलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतो. आम्ही गाणी, नृत्य आणि नाटक सादर करतो. आमच्या शिक्षकांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि समृद्धीसाठी आम्ही प्रार्थना करतो .
शेवटी, आम्ही सर्व शिक्षकांना रंगीत आवरण असलेली भेटवस्तू देखील देतो. आम्ही काळजी घेतो की आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान करणार . आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांना सांगतात की त्यांना त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे आणि त्यांचा आभिमान आहे. आम्ही आमच्या आवडत्या शिक्षकांना ग्रिटींग कार्ड आणि फुले देतो. त्यांच्या चेहर्यावर प्रेमळ, आनंदी हसू आमच्यासाठी पुरेसं बक्षीस असते . शिक्षक दिवसांच्या प्रसंगी आम्ही आमच्या शिक्षकांना आनंदी ठेवण्याचा आमचा उद्देश असतो . याची सर्वांनाच जाणीव असते .