Essay on trees in marathi language
Answers
झाडांवर निबंध
झाडे निसर्गाची मानवाला भेट आहे. झाडे कुठलीही अपेक्षा न बाळगता ओल्याला नेहमीच मदत करतात. झाडे अनेक स्वरूपात आपल्याला कामी येतात. मग ते घर बांधण्यासाठी लाकूड असो की चुलीत घालण्यासाठी फाटी असो. भूक लागली तर झाडे फळं देतात. ऊन लागलं की सावली देतात. मन दुखावले असले, तर फुलांच्या सुगंधाने मन मोहीत करतात. झाडे हे मानव जातीवर जणू एक उपकारच आहे.
झाडे हे पक्षांचे घर असते. त्याच्या पानांनी खत तयार करता येतो ज्याचा उपयोग शेतात केला जातो. शेतात सुद्धा पीक हे झाडाचं तर आहे. झाडे आपले पालन पोषण करतात. आयुर्वेदात सुद्धा झाडांचे अनेक उपयोग आहेत. झाडांचे अनेक अवयव औषधी आहेत.
एवढंच नाही तर झाडांमुळे हवेचे शुद्धीकरण होते. झाडांमुळेच पाऊस पडतो. झाडांमुळे माणसांना श्वास घेण्यासाठी प्राणवायू मिळते.
झाडांपासून कागद, डिंक, रबर, मेहेंदी ह्या वस्तू मिळतात.
झाडे आपली खरे मित्र आहेत.