Essay on watchman in Marathi
Answers
Explanation:
watchmen protect us from that Thief they are sincere in duty they work hard all day and night
■■'वॉचमैन', वर निबंध■■
आमच्या इमारतीत एक वॉचमैन पहारा द्यायला असतो.त्याचे नाव आहे लक्ष्मण. लक्ष्मण खूप ईमानदारीने त्याचे काम करतो.
आमच्या इमारतीत येणाऱ्या लोकांची नावे तो एका वहीत लिहून ठेवतो. तो असल्यावर आम्हाला आमच्या इमारतीत सुरक्षित वाटते. आमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे त्याचे नीट लक्ष असते.
लक्ष्मण, जवळच एका घरात राहतो. त्याच्या घरी त्याचे आईवडीलही राहतात. त्याला दोन मुले आहेत. ती शाळेत जातात. तो त्याचे काम खूप मेहनतीने करतो.
लक्ष्मण गरीब आहे. कधीकधी तो आपली अडचण आम्हाला सांगतो. मग आम्ही त्याला आमच्या तऱ्हेने मदत करतो. तो नेहमी हसतमुख असतो. तो कधी कोणाशी भांडत नाही. कोणावर रागवत नाही.
लक्ष्मण रोज संध्याकाळी आमच्या इमारतीत येतो. मग तो रात्रभर आमच्या इमारतीत थांबतो. रात्रभर तो आमच्या इमारतीला पहारा देतो. तो असल्यामुळे आम्ही शांतपणे घरात झोपू शकतो.
आम्ही इमारतीमधील सगळी मुले त्याला लाडाने "लक्ष्मण मामा" म्हणतो. आमचा लक्ष्मण मामा आम्हाला सगळ्यांना आवडतो.