India Languages, asked by Kinal4860, 1 year ago

Essay on Water Pollution in Marathi
मराठी भाषण जल प्रदुषण

Answers

Answered by BHERE
27

जल प्रदूषणाची निरिक्षण

औद्योगिक वसाहती व कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.

नदीत कपडे/गुरे धुणे,अंघोळ करणे, भांडी घासणे यामुळे जलप्रदूषण होते.

रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

जल प्रदूषणाला शहरीकरण, आणि शहरातील अपुरे सांडपाणी व्यवस्थापन हे महत्वाचे कारण आहे. तसेच रोजच्या वापरातील शरीर स्वच्छता आणि घराची स्वच्छता यासाठी वापरण्यात येणारी विविध रसायने यांचा महत्वाचा भाग आहे.

पाण्यातून होणाऱ्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषतः पाच वर्षांच्या आतील मुले अशा संसर्गाला बळी पडतात. जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. जगात उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी फक्त १ ते १.५ % पाणीच पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ ९८ % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपून वापरणे गरजेचे तर आहेच आणि पिण्यायोग्य पाण्यात प्रदूषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे. जलप्रदूषण हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे.

जलप्रदुषणाची सामान्य कारणे – कचरा व सभान याचे वापर करणे

अनेक कारणांद्वारे जलप्रदूषण होत असते

 औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्याने

 सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याने,

 रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने,

 पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,

 कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,

 जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने, मृत जनावरे नदीत टाकल्याने,

 रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते.

 जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, कावीळ, विविध प्रकारचे ताप, पटकी, मलेरिया, खोकला, सर्दी यांसरखे विकार होतात.

 रासायनिक पदार्थयुक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न होतात.


BHERE: mark as brainliest plz...
Answered by Haezel
76

मराठी भाषण जल प्रदुषण :

जल प्रदुषण म्हणजे पाण्याच्या मोठ्या साठ्यांमध्ये दुषित पदार्थ मिसळणे म्हणजे जल प्रदुषण होय. जल प्रदुषण मानवी आरोग्यास खुप्च हानीकारक आहे. ही मानवनिर्मित समस्या आहे. पाणी हे मानवाला आवश्यक आहे. दुषित पाण्यामुळे खुप असे रोग उध्दभवतात. कारखान्यांचे दुषित पाणी नाल्यांद्र्वारे नदीत सोडले जाते. त्यामुळे जलप्रदुषण मोठ्या प्रमाणात होते.  नदी मध्ये कचरा, प्लास्टिकच्या वस्तू फेकल्यास जल प्रदुषण होते. पृथ्वीवरील एकुण पाण्यापैकी १ % ते १.५% पाणी पिण्यायोग्य आहे. ९८ % पाणी समुद्र व बर्फाच्या रुपात आहे. त्यामुळे जे पाणी पिण्यायोग्य आहे त्याचा वापर जपुन करायला  हवा. जल प्रदुषण कमी कसे करता येईल त्यावर उपाययोजना करायला पाहिजे . त्याकरता सांड्पाण्याचे  योग्य नियोजन करणे, नदी काठी कपडे , भांडी न धुणे, कचरा नदी, तलावात न टाकणे, शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे.  


Anonymous: awesome answer mam
Similar questions