Essay on Yatra in Marathi.
मराठी निबंध यात्रा
Answers
मराठी निबंध यात्रा :
यात्रा हा संस्कृत शब्द आहे, मराठीत त्याला जत्रा असे म्हणतात. जत्रा म्हणजे एखाद्या गावात ग्रामदेवतेची दरवर्षी खुप उत्सवात केली जाणारी पुजा होय. अशा या जत्रेला गावागावातून लोक येतात. तेथील देवाची मनोभावे पुजा करतात. जत्रेत घरातील सगळी मंडळी लहान-मोठी माणसे सुध्दा एकत्र येऊन आनंद मोठ्या उत्साहात साजरा करतात. लोक संपर्क वाढविणे हेच या जत्रेचे उद्दिष्ट आहे. जत्रेत खुप मज्जा येते. तेथे वातावरण कसे रंगीबेरंगी असते, मंदिराची सजावट, भोवतालची सजावट पाहण्यासारखी असते. काही ठिकाणी खाद्य पदार्थ, तर काही ठिकाणी खेळणी, बांगड्या, दागिने यांची छोठी दुकाने लावलेली असतात. मोकळ्या मैदानावर मोठ्मोठाले आकाश पाळणे, झोपाळे अजुन इतर खेळणी असतात. जत्रेत बैलगाडी शर्यत पण असते. विविध रंगांनी सजलेल्या बाजारपेठा म्हणजे पर्वणीच ठरली जाते. जत्रा म्हणजे पर्यटन महोत्सवच होय.
Answer:
ganpti ustav che niband paje