essye on मदर तेरेसा in Marathi
Answers
⠀⠀⠀⠀ मदर तेरेसा
मदर तेरेसा ही एक जगावेगळी 'मदर' ! साऱ्या जगाची, गोरगरिबांची ती आई झाली. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले. तेव्हाच त्यांनी ठरवले की, आपण मिशनरी व्हायचे, गरिबांच्या सेवेसाठी आपले आयुष्य खर्च करायचे.
स्वदेश सोडून त्या कोलकात्याला आल्या. सतत ३१ वर्षे त्या कोलकात्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये कार्य करत राहिल्या. लाखो गोरगरिबांची त्या 'आई' झाल्या. मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णाला त्यांनी आपल्या आश्रमात आणले. त्याला न्हाऊ घातले. त्याच्या आयुष्यात त्यांनी काही क्षण तरी आनंद निर्माण केला.
मदर तेरेसांच्या महान कार्याचा गौरव जगाने १९७९ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन केला. त्या रकमेतून त्यांनी घरे नसलेल्या लोकांसाठी घरे बांधून दिली. त्यांच्या संस्थेने अनेक शाळा, अनाथालये, हॉस्पिटले, पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. आजही १२७ देशांत त्यांनी उभारलेल्या संस्थांमार्फत कार्य सुरू आहे. अशी ही महान सेविका १९९७ साली निधन पावली.