Business Studies, asked by TbiaSamishta, 10 months ago

Explain contribution of Mahila Bachat Gat in Maharashtra.

Answers

Answered by xItzKhushix
0

\huge\red{\boxed{\bf{\ulcorner{\mid{\overline{\underline{Answer:-}}}}}\mid}}

महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंच करण्यासाठी ‘बचतगट’ हा उपक्रम सरकारकडून चालवला जातो. याची जी प्रक्रिया आहे ती एकमेकांना संघटितपणे एकमेकांना समजून घेत हा गट तयार होतो. या गटांना स्वयंसाहाय्यक गट असेही म्हटले जाते. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे गट स्थापन केले गेले आहेत. या गटामध्ये स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव नाही. कमीत कमी दोन किंवा जास्तीत जास्त २० याप्रमाणे गट तयार केले जातात. यामध्ये प्रत्येक गटातील प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीमध्ये बचत म्हणून एक ठरावीक रक्कम गटात जमा करते. हा कालावधी आठवडय़ातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असतो. ही जमा केलेली रक्कम बचतगटातील सदस्यांना कर्ज म्हणून मिळते. सभासदाने हप्त्याहप्त्याने बचतगटाला कर्ज परत करणे अपेक्षित असते. बचतगट लोकशाही तत्त्वावर आधारित असल्याने प्रत्येक सदस्याला समान अधिकार असतो व त्याचे कर्ज व परतफेड कसे करायचे हे तो बचतगट ठरवत असतो. बचतगट हे नोंदविण्याची आवश्यकता नसते. ‘नाबार्ड’ या सरकारी यंत्रणेनुसार केवळ बचतगटांच्या सदस्यांच्या ठरावानेही बॅँकेत खाते काढता येऊ शकते. १९९८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पात आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अशा नोंदणी झालेल्या बचतगटांना राज्य व केंद्र सरकारने बचतगटासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. जसे महाराष्ट्र शासनाने महिला बचतगटांना बॅँकेतून कर्ज घेताना मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. यामुळे सोप्या पद्धतीने कर्जपुरवठा होतो.

स्त्रिया एकत्रित येऊन व्यवसाय करत असल्यामुळे व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया असल्यामुळे स्त्रियांमध्ये मोठय़ा प्रमाणात उद्योजकता निर्माण झाली आहे. अनेक प्रकारचे उद्योग या चळवळीतून जन्माला आले आहेत. यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतून या बचतगटाचे कार्य चालते. ग्रामीण भागातील दारिद्रय़रेषेखालील स्त्रिया बचतगटास ग्रामविकास विभागाच्या ग्राम स्वयंरोजगार योजनेत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गट विकास अधिकारी, (पंचायत समिती) यांच्याकडून स्वयंरोजगारासाठी १० हजार रुपये अनुदान दिले जाते व त्यावर बॅँकेकडून १५ हजार रुपये कर्ज असे एकूण २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. शहरी भागातील व्यक्तींच्या बचतगटास आयुक्त तथा संचालक महानगरपालिका प्रशासन यांच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेत उपयुक्त, महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडून स्वयंरोजगारासाठी सव्वा लाख रुपये अनुदान व उर्वरित सव्वा लाख राष्ट्रीयीकृत बॅँकेकडून कर्जरूपाने मिळते. शहरी भागातील दारिद्रय़रेषेखालील लाभार्थ्यांस आयुक्त तथा संचालक, महानगरपालिका प्रशासन यांच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेत उपायुक्त महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडून स्वयंरोजगारासाठी १५ टक्के, परंतु कमाल ७५०० रुपये इतके अनुदान शासनाकडून दिले जाते. हे अनुदान राष्ट्रीयीकृत बँकेकडील जास्तीत जास्त कर्ज ५० हजार रुपयांवर दिले जाते. राष्ट्रीयीकृत बँका गटांच्या बचतीच्या प्रमाणावर १:२ ते १:४ या प्रमाणात टप्प्याटप्प्याने कर्ज देतात. सहकारी बँका बचतगटाच्या प्रमाणावर म्हणजेच १:१ ते १:४ या प्रमाणात व्यवसायासाठी कर्ज देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया बचतगटातील सदस्याला घरबांधणीसाठी ५० हजार रुपये व भूखंड खरेदीसाठी २५ हजार रुपये कर्ज ७.७५ टक्के व्याजदराने देते. बचतगटामध्ये महिला बचतगट व पुरुषांचा बचतगट, ग्रामीण बचतगट, शहरी बचतगट व दारिद्रय़रेषेखालील बचतगट व दारिद्रय़रेषेवरील बचतगट इतके प्रकार असतात. कायदा मिश्र बचतगटांना परवानगी देत नाही. बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंच्या जाहिरातीसाठी आणि विक्रीसाठी सरकारसुद्धा मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवते.

अलीकडेच शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंचे, खाद्यपदार्थाचे मोठे प्रदर्शन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये भरवण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायांतल्या महिला बचतगटांनी अतिशय मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदविला व कोटय़वधी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनानिमित्त झाली. यासाठी या आयोजनासाठी केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा काही निधीपण राखीव असतो. सरकार, जिल्हा परिषद यांमार्फत या बचतगटासाठी काही निधी हा राखीव असतो. राज्यस्तरीय प्रदर्शनसुद्धा यामार्फत घेतले जाते. महाराष्ट्रातल्या विविध जिल्हय़ांमध्ये असलेल्या बचतगटाच्या व्यवसाय तेथील भौगोलिक स्थितीवर खूप अवलंबून असतो. जसे कोल्हापूर येथे दूध व्यवसायावर आधारित बचतगट सामूहिक दुग्ध व्यवसाय शाहुवाडी तालुक्यातील मानकरवाडीच्या सरस्वती महिला बचतगटाने सुरू करून ४०० लोकसंख्या असलेल्या या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. सोलापूर जिल्हय़ातील अक्कलकोटजवळच्या जेऊर येथील श्री जीवनज्योती महिला विकास बचत हा सॅनिटरी नॅपकिन बनवणारा महाराष्ट्रातला पहिला बचतगट होता आणि आता यांचे २५ जिल्ह्य़ांत सॅनिटरी नॅपकिन निर्मितीचे युनिट्स आहेत.

HOPE IT HELPS YOU ^^

Answered by Arslankincsem
0

Answer:

Mahila Bachat Gat refers to the program for the development of women's entrepreneurship.It is a socio economic initiative that helps in being organized. The savings group is given such a name since it helps in saving up your finances. All the members of the group can consist of both men and women however it should be made sure that they do nto exceed the number by 20 in total.

Similar questions